गौतम कांबळे यांची शिक्षक संघटना समन्वय समितीच्या “राज्यमहासचिव” पदी निवड

दिनेश पवार:दौंड:प्रतिनिधी

गौतम कांबळे यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समन्वय समितीच्या ” राज्यमहासचिव ” पदी निवड करण्यात आली आहे .याबाबतची माहिती समन्वय समितीचे राजाध्यक्ष अरुण जाधव व राज्य समन्वयक प्रकाश घोळवे यांनी दिली .

गौतम कांबळे हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोरवडी तालुका दौंड जिल्हा पुणे येथे कार्यरत आहेत .ते सध्या महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ व मुलनिवासी शिक्षक संघ या संघटनांचे राज्याध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत .महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समन्वय समितीमध्ये राज्यातील 38 शिक्षक संघटनांचे पदाधिकारी सहभागी आहेत .गौतम कांबळे यांच्या निवडीबद्दल राज्यातील शिक्षकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे .

Previous articleतायकांदो स्पर्धेत किरण गायकवाडला सुवर्णपदक
Next articleशाश्वत रोजगार व असंघीटत क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा करिता भामसंघ चा मुंबई मध्ये मोर्चा : पुण्यातील हजारो च्या संख्येने कामगार सहभागी