शाश्वत रोजगार व असंघीटत क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा करिता भामसंघ चा मुंबई मध्ये मोर्चा : पुण्यातील हजारो च्या संख्येने कामगार सहभागी

कुरकुंभ : प्रतिनिधी, सुरेश बागल

महाराष्ट्रातील कामगारांना शाश्वत रोजगार व असंघीटत क्षेत्रातील कामगारांच्या न्याय हक्कांच्या मागणी बाबतीत सरकार ने सकारात्मक प्रतिसाद द्यावा अन्यथा भामसंघ विविध ठिकाणी तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा भामसंघाने आझाद मैदानावर झालेल्या महामोर्चाच्या वेळी दिलेला आहे.

महाराष्ट्र राज्यातील गेल्या अनेक वर्षापासून कायम स्वरूपी काम कंत्राटी, आऊटसोर्सिंगने पध्दतीने चालत असल्याने कंत्राटी कामगार पध्दत मोठ्या प्रमाणात वाढत आहे अनेक ठिकाणी लागू असलेल्या कामगार कायद्यातील तरतूदी चे पालन होत नाही या करिता संघर्ष करावा लागतो. विविध सरकारी, निमित्ताने सरकारी, बॅंक, वीज, रस्ता, पाणी, शिक्षण, आरोग्य, या खात्यातील कायम स्वरूपी कामासाठी मोठ्या प्रमाणात कंत्राटी कामगार अल्प वेतनावर काम करीत आहे. त्यांना कोणतीही सुरक्षा नाही. या कामगारांच्या विविध मार्गांनी आर्थिक शोषण होत आहे. म्हणून सरकारच कंत्राटी पध्दतचा अवलंब करून कामगार कायद्यातील पळवाट शोधून हे शोषण केले जाते त्यामुळे या सर्व कामगारांना सेवेत कायम करून न्याय द्यावा अशी मागणी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष नीलेश खरात यांनी केली आहे.
राज्य सरकार ने कामगार विरोधी बदल ऊदा फिस्क टर्म एम्प्लॉयमेंट, ले ऑफ, रिजेस्टमेंट, संप ,क्लोजर या बाबतीत बदल, कारखाने अधिनियम कायदा, कंत्राटी कामगार कायदा, स्टँडींग ऑर्डर चे नियम, संघटना मान्यतेचे अधिकार व्यवस्थापनाला देणे ई.बाबतीत भारतीय मजदूर संघाने या बाबतीत वेळोवेळी आक्षेप, लेखी निवेदन देवुनही सरकारने या मागण्यांकडे पुर्णपणे दुर्लक्ष केले आहे. याचा निषेध भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. ऍड. अनिल ढुमणे यांनी व्यक्त केला आहे. एकतर्फी कामगार विरोधी धोरण बदल मागे घेण्याची मागणी भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मोहन येणूरे यांनी महामोर्चा व्दारे केलेली आहे.

असंघीटत क्षेत्रातील बांधकाम, घरेलु,बिडी,शेतमजुर,अंगणवाडी, मत्स,आशा वर्कर्स, टेलर, या कामगारांना करिता कोणतेही कायदा वा उपाय योजना केल्या नसल्याने भारतीय मजदूर संघाने याबाबतीत मागन्या केल्या आहे. अर्थसंकल्पामध्ये या बाबत तरतूद करावी अशी मागणी भा.म.संघाचे राष्ट्रीय सचिव सुरेद्रनजी पांडे यांनी केली आहे.

या मोर्चा मध्ये पुणे जिल्हातील विविध ऊद्योगातील पदाधिकारी उपस्थित होते. औद्योगिक,वीज, संरक्षण,बँका, पोस्ट, कंत्राटी कामगार, बिडी, घरेलु, हॉस्पिटल नगर पालिका, राज्य सरकारी व वीज कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

महत्वपूर्ण मागण्या

१) हरियाणा, ओडिसा राजस्थान,पंजाब सरकार प्रमाणे महाराष्ट्रात कंत्राटी कामगार पध्दत बंद करून कार्यरत सर्व कंत्राटी कामगारांना कायम नोकरीत समाविष्ट करावेत.

२) जिल्हा स्थानी कामगार राज्य रूग्णालय सुरू करावे.

३) बांधकाम व सुरक्षा मंडळा चे व घरेलु कामगार मंडळाचे लाभ पुर्व लक्षी प्रभावाने द्यावा.

४) अंगणवाडी सेविकांना किमान १५ हजार रूपये मानधन द्यावेत.

५) बिडी कामगारांच्या किमान वेतनाची प्रभावी अंमलबजावणी करावी व त्याना मागील फरक देण्यात यावा.

६) रिक्षा व टँक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावे.

८) वेतन कोड २०१९ व सामाजिक सुरक्षा कोड २०२० त्वरित लागु करावे.असंघीटत क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा लागू करा.

९) औद्योगिक संबंध कोड २०२० व औद्योगिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची स्थिती कोडं २०२० या मधील कामगार विरोधी तरतूदी रद्द कराव्यात.

१०) सार्वजनिक ऊद्योगांचे खाजगी करण व निर्गुंतवणूक थांबवा.

११) कोरोना काळात सेवा दिलेल्या आरोग्य सेवेतील कामगारांना शासन सेवेत कायम करावे. ई मागण्या केल्या आहेत.

या मोर्चा चे निवेदन सहसचिव कामगार विभाग श्री शिंदे ,तसेच सरकार च्या कामगार मंत्री यांचा वतीने आझाद मैदानावर मा कामगार उपायुक्त श्रीमती शिरीन लोखंडे , सहाय्यक कामगार आयुक्त श्रीमती अत्तार यांनी उपस्थित राहून निवेदन स्विकारले आहे.

पुणे जिल्हा चे नेतृत्व भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष अर्जुन चव्हाण, बाळासाहेब भुजबळ सेक्रेटरी, सचिन मेंगाळे (सरचिटणीस अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघ ) संजय मेनकुदळे (संरक्षण) , कामगार महासंघाचे सुरेश जाधव, कंत्राटी संघांचे निखिल टेकवडे, दिपक कुलकर्णी,( मनपा) , अशोक थोरात (संरक्षण कंत्राटी संघ, ) विलास टिकेकर (बॅंक) , उमेश विस्वाद (बिडी ) बेबीराणी डे (अखिल भारतीय बिडी मजदूर) ललिता पवार (घरेलु) विवेक ठकार (राज्य सरकारी कामगार) वंदना कामठे (टेलीफोन) अनिल पारधी (सुरक्षा रक्षक) यांनी केले आहे.
महामोर्चा मध्ये भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय सचिव सुरेद्रनजी पांडे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. अनिल ढुमणे, महामंत्री मोहन येणूरे, श्रीपाद कुटासकर, उपस्थित होते.मुंबई भारतीय मजदूर संघ अध्यक्ष बापू दडस यांनी सुत्रसंचालन व सचिव संदीप कदम यांनी आभार मानले.

Previous articleगौतम कांबळे यांची शिक्षक संघटना समन्वय समितीच्या “राज्यमहासचिव” पदी निवड
Next articleबिडी कामगारांच्या किमान वेतन संदर्भात लेबर ऑफिसकडून कारवाई करणार