तायकांदो स्पर्धेत किरण गायकवाडला सुवर्णपदक

दिनेश पवार:दौंड:प्रतिनिधी:

जेजुरी धालेवाडी येथे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग – क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे,अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय तायकॉनदो स्पर्धा सन 2022/2023 पार पडल्या या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील 14 तालुक्यातून अंडर 14/16/17 या वयोगटातील 140 ते 150 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये दौंड तालुक्यातील 25 खेळाडूंनी सहभाग घेतला.

अंडर 19 वयोगटात दौंड पोलीस स्टेशन येथे नेमणूकीस असलेले महेंद्र गायकवाड,सहा.पोलीस उपनिरीक्षक यांचा मुलगा व शेठ ज्योतीप्रसाद विद्यालयाचा विद्यार्थी करण महेंद्र गायकवाड याने गोल्ड मेडल मिळवले.त्याची दौंड तालुक्यातून कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.तसेच दौंड तालुक्यातून प्रणिल कांबळे, आदित्य आवळे, आयुश चव्हाण यांनी सहभाग घेतला होता. खेळाडूंना प्रवीण होले व साईबाबू पहाडे यांचे मार्गदर्शन लाभले

Previous articleदौंड नगरपरिषद तर्फे लिंग आधारित हिंसेबाबत कार्यशाळा आणि रॅलीचे आयोजन
Next articleगौतम कांबळे यांची शिक्षक संघटना समन्वय समितीच्या “राज्यमहासचिव” पदी निवड