दौंड नगरपरिषद तर्फे लिंग आधारित हिंसेबाबत कार्यशाळा आणि रॅलीचे आयोजन

दिनेश पवार:दौंड:प्रतिनिधी:

दौंड नगरपरिषदेतर्फे लिंग आधारित हिंसेबाबत कार्यशाळा, चर्चासत्र आणि प्रबोधन रॅलीचे आयोजन करण्यात आले.स्त्री पुरुष समानता याविषयी मार्गदर्शन करताना स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर प्रमाण या आणि अशा बऱ्याच गोष्टी बद्दल चर्चा करताना वकीली व्यवसायात दैनंदिन कामकाज करत असताना येणारे अनुभव शितल मोरे यांनी सांगितले.माझी वसुंधरा अभियान अंतर्गत जुन्या साडी पासून पिशवी तयार करून वापरल्याने प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यास व्यापक मदत होते. हा विचार सविता भोर यांनी मांडला, त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने हा पर्यावरणपूरक विचार रूजवण्यासाठी हरीत शपथ घेण्यात आली.मान्यवरांच्या सत्कारासाठी दौंड नगरपरिषद नर्सरीमधून आणलेले वृक्ष भेट देण्यात आली. या कार्यक्रमास सविता भोर,शितल मोरे,प्रमोद शितोळे यांचे मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमा दरम्यान दौंड नगरपरिषद बचत गट महिला, कौसर सय्यद, ज्योती मोकळ,सुरैय्या शेख,विद्या भुजबळ, तसेच दौंड नगरपरिषद उपमुख्याधिकारी सुप्रिया गुरव, बांधकाम अभियंता अपर्णा लोमटे,वसुली विभाग प्रमुख हनुमंत गुंड, सहाय्यक शहर प्रकल्प अधिकारी दीपक म्हस्के, शहर समन्वयक शुभम चौकटे इ. उपस्थित होते.

Previous articleजिल्हा परिषद शाळा खोरवडी येथे बाल आनंद मेळाव्यानिमित्त आठवडे बाजार संपन्न
Next articleतायकांदो स्पर्धेत किरण गायकवाडला सुवर्णपदक