जिल्हा परिषद शाळा खोरवडी येथे बाल आनंद मेळाव्यानिमित्त आठवडे बाजार संपन्न

दिनेश पवार:दौंड:प्रतिनिधी:

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोरवडी तालुका दौंड येथे बाल आनंद मेळाव्यानिमित्त आठवडे बाजार भरविण्यात आला होता .या आठवडे बाजाराचे उद्घाटन गावच्या सरपंच शोभा खोमणे यांच्या हस्ते करण्यात आले .

यावेळी उपसरपंच दीपक सोनवणे ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा शितल सोनवणे , उपाध्यक्ष बाबा सकट ,अतुल सोनवणे ,राजू गुन्नर , प्रशांत सकट , शाळेचे मुख्याध्यापक राजाराम पासलकर , गौतम कांबळे , अभिजीत कोंडेजकर , नीता भद्रे , साक्षी कोंडेजकर हे शिक्षक उपस्थित होते .

या आठवडे बाजाराच्या निमित्ताने खरेदी-विक्री करण्याचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला .या आठवडे बाजारात वीस हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेची उलाढाल झाली .विद्यार्थी पालक व ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे या शाळेतील आठवडे बाजाराचा आनंद घेतला .विद्यार्थ्यांना खरेदी-विक्रीचा अनुभव मिळाल्यामुळे पालकांनी समाधान व्यक्त केले .

Previous articleमाधुरी काकडे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय शिक्षिका पुरस्कार व महाकवी पद्मश्री नामदेव ढसाळ साहित्य पुरस्कार
Next articleदौंड नगरपरिषद तर्फे लिंग आधारित हिंसेबाबत कार्यशाळा आणि रॅलीचे आयोजन