माधुरी काकडे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय शिक्षिका पुरस्कार व महाकवी पद्मश्री नामदेव ढसाळ साहित्य पुरस्कार

दिनेश पवार:दौंड:प्रतिनिधी:

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षक अकादमीच्या वतीने धुळे शहरात 24 व 25 डिसेंबर 2022 ला दोन दिवसीय ‘दुसरे फुले-आंबेडकर विचार शिक्षक संमेलनात माधुरी काकडे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय शिक्षिका पुरस्कार व महाकवी पद्मश्री नामदेव ढसाळ साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.
नागनाथ कोत्तापल्ले सभा मंच, राजश्री शाहू महाराज नाट्यमंदिर, पारोळा रोड, धुळे येथे झालेल्या या संमेलनाचे अध्यक्षस्थान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर श्रीपाल सबनीस होते
संमेलनाचे उदघाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड चे विभागप्रमुख प्राध्यापक डॉक्टर केशव देशमुख यांच्या हस्ते झाले.आयोजक भास्कर अमृतसागर,प्रा.डॉक्टर प्रदीप आगलावे,डॉक्टर मिलिंद बागुल,जिल्हा कोषागार अध्यक्ष प्रवीण देवरे,रविंद्र खैरनार , राजू हाके आदी प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.

परिसंवाद,काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते
लोकसभेचे माजी उपाध्यक्ष सरदार चरणजितसिंग अटवाल यांच्या शुभहस्ते माधुरी काकडे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2022 व माधुरी काकडे यांनी संपूर्ण पर्यावरणावर आधारित लिहिलेल्या ‘सृष्टीकाव्य’ या काव्यसंग्रहास महाकवी पद्मश्री नामदेव ढसाळ साहित्य पुरस्कार 2022 प्रदान करण्यात आला याप्रसंगी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस, धुळ्याचे महापौर प्रवीण कर्पे, डॉ. प्रा. मिलिंद बागुल, राजू हाके आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleउरुळी कांचन येथील १९९५-९६ बॅचच्या विद्यार्थ्यांनी केले महात्मा गांधी विद्यालयात १०० झाडे लावून वृक्षारोपण
Next articleजिल्हा परिषद शाळा खोरवडी येथे बाल आनंद मेळाव्यानिमित्त आठवडे बाजार संपन्न