कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय मजदूर संघ रस्त्यावर

कुरकुंभ , सुरेश बागल

भारतीय मजदूर संघ विदर्भ प्रदेशाची मजदूर चेतना संकल्प यात्रा १२ ते १३ डिसेंबर अशी होती.  या संकल्प यात्रा भारतीय मजदूर संघ संस्थापक श्रध्देय दत्तोपंत ठेंगडी यांचा जन्मभुमी आर्वी जि वर्धा येथुन संकल्प ज्योत प्रज्वलीत  भारतीय मजदूर संघ अध्यक्ष शिल्पा देशपांडे व महामंत्री मा गजानन गटलेवार यांच्या नेतृत्वाखाली  सुरुवात झाली. दोन विभागात जनसंपर्क,  मेळावे,  गेट मिटींग विविध जिल्हा मध्ये झाल्या,  या वेळी मोठ्या उत्साहात स्वागत होवून मोर्चा मध्ये सहभागी होण्यासाठी संकल्प करण्यात आला.

या संकल्प यात्रा  नागपूर महानगर व परिसरात   बुधवार दिनांक १४ डिसेंबर रोजी ही यात्रा काढण्यात आली. २१डिसेंबर रोजी मुंबई आझाद मैदान येथुन मंत्रालयावर मोर्चा तर २८डिसेंबर रोजी नागपूर च्या यशवंत स्टेडियम पासून विधानसभेवर मोर्चा निघणार आहे.

 

कोराडी येथील जगदंबा माता मंदिर परिसरात वीज निर्मिती प्रकल्प कोराडी, खापरखेडा,तसेच महावितरण व महापारेषण मधील नागपूरच्या विविध संघटनेचे प्रमुख पदाधिकारी व कामगार उपस्थित होते.या ठिकाणी सिताराम हटवार, वामन मराठे, महेंद्र बागडे,चैनदास भालाधरे, राहुल नागदेवे, प्रतिक रंगारी, धनंजय जांभुळकर, साहेबराव करडभाजणे,उमेश पारधी इत्यादी नेते उपस्थित होते.

 

महावितरणचे काटोल रोडवरील प्रादेशिक संचालक कार्यालय तसेच वेस्टर्न कोल ऊद्योग, तंबाखू उद्योग व संध्याकाळी रेशीमबाग मैदानावर सर्व कामगारांची मिटींग आयोजित करून मोर्चा मध्ये सहभागी होण्यासाठी संकल्प करण्यात आला.

 

ओडिसा, राजस्थान,पंजाब येथे शासनाच्या विविध नियमित रिक्त पदावर कार्यरत सर्व कंत्राटी कामगारांना त्यांच्या राज्यात कायम करण्यात आले त्याच प्रमाणे महाराष्ट्रातील वीज उद्योगतील  व रिक्त पदांवर कार्यरत सर्व कंत्राटी कामगारांना देखील महाराष्ट्र शासनाने कायम करावे या मागणी च्या जनजागृती साठी ही मिटिंग व यात्रा आयोजित केली होती.

महत्वाच्या मागण्या

ओरिसा,  राजस्थान राज्य च्या प्रमाणे कंत्राटी कामगार नोकरीत कायम करावे.

 

प्रलंबित किमान वेतन पुन:निर्धारित करून लागु करण्यात यावी.

 

अंगण वाडी कामगारांना व आशा वर्कर्स यांना  शासकीय सेवेत सामावून घ्यावे.

 

भंडारा, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांना शासकीय नियमा प्रमाणे १५ % नक्षलग्रसत भत्ता देण्यात यावा.

 

ई संघटित व असंघीटत क्षेत्रातील कामगारांच्या न्याय हक्कांच्या मागणी करिता मोर्चा चे आयोजन केले आहे.

या यात्रेचे समारोप रेशीमबाग मैदान येथे सर्व कामगारांनी त्यांच्या मोबाईलचे टॉर्च लावून प्रतिकात्मक संकल्प  करण्यात आला .यामध्ये महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष निलेश खरात सरचिटणीस सचिन मेंगाळे   भारतीय मजदूर संघ नागपूर जिल्हा सचिव श्री हर्षद ठोंबरे, कार्याध्यक्ष तिर्थराज बडमे, कामगार महासंघाचे अध्यक्ष विठ्ठल भालेराव कार्यकारिणी सदस्य शंकरराव पहाडे  यांनी मार्गदर्शन केले .

 

 

या मध्ये महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांचे राकेश मथुरे, अभिजीत माहुलकर, विनोद बनसोड, मोहन देशमुख, विलास गुजरमाळे, पवन कोठारी यांनी महत्वपूर्ण प्रयत्न करून कामगारांना एकत्र केले.

 

न्याय मागण्यासाठी हजारो च्या संख्येने मुंबई व  नागपूर मोर्चात सहभागी होण्यासाठी भारतीय मजदूर संघाने आवाहन केले.

Previous articleदुचाकी व टेम्पो अपघातात एक जणाचा जागीच मृत्यू नारायणगाव येथील घटना
Next articleसरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात भारतीय मजदूर संघाचा विधानसभेवर मोर्चा : संकल्प यात्रेला श्रध्देय दत्तोपंत ठेंगडी यांच्या जन्मभूमीतुन सुरवात