सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात भारतीय मजदूर संघाचा विधानसभेवर मोर्चा : संकल्प यात्रेला श्रध्देय दत्तोपंत ठेंगडी यांच्या जन्मभूमीतुन सुरवात

कुरकुंभ :प्रतिनिधी, सुरेश बागल

कामगार कायद्यातील एकतर्फी बदल, कामगारांच्या कायम स्वरूपी रोजगारावर आलेली गदा, सरकारचा कामगारांच्या करिता असलेला उदासीन दृष्टीकोन महाराष्ट्रातील असंघीटत कामगारांना कोणत्याही प्रकारची सामाजिक सुरक्षा नसणे , विविध ऊद्योगातील वाढत चाललेली कंत्राटी कामगारांची मोठी संस्खा, घटत चाललेला कायम स्वरूपी नोकरी अशाच विविध प्रश्नांवर संघटित व असंघीटत कामगारांच्या मागण्यां करिता भारतीय मजदूर संघ विदर्भ प्रदेशाने दि .२८ डिसेंबर २०२२ रोजी विधानसभा नागपुर येथे हजारो च्या संख्येने येथे भव्य मोर्चा काठुन सरकार ला जाब विचारणार असल्याची घोषणा भारतीय मजदूर संघ विदर्भ प्रदेश अध्यक्ष शिल्पा देशपांडे यांनी दि. १२ डिसेंबर २०२२ रोजी भारतीय मजदूर संघ संस्थापक श्रध्देय दत्तोपंत ठेंगडी यांच्या जन्म ठिकाण आर्वी येथे झालेल्या सभेत ईशारा दिला आहे.

दि. १२ ता. पासून विदर्भ प्रदेश मध्ये संकल्प यात्रा ची सुरुवात झाली आहे. या वेळी भारतीय मजदूर संघ विदर्भ प्रदेश महामंत्री मा. गजानन गटलेवार यांच्या नेतृत्वाखाली भंडारा, साकोली, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपुर, नागपूर अशा ठिकाणी कामगारांना जागृती करणार आहेत. तसेच अध्यक्ष शिल्पा देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली वर्धा अमरावती, अकोला, शेगाव, बुलठाणा, यवतमाळ, वाशीम या जिल्ह्यात संकल्प यात्रा आयोजित केली आहे. या मध्ये भारतीय मजदूर संघाच्या केंद्रीय उपाध्यक्ष निता चौबे, अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे, डाॅ शरद देशपांडे, उपस्थित होते.
सदरील कार्यक्रमात मोठ्या संख्येने विविध ऊद्योगातील कामगार उपस्थित होते.
भा.म.संघाने विदर्भ प्रदेशाने 2२८ डिसेंबर २०२२ मंत्रालय नागपूर येथे कामगारांच्या विविध मागण्यांसाठी न्याय हक्कांच्या करिता कामगारांच्या भव्य मोर्चा काढणार असुन या मोर्चा मध्ये महाराष्ट्रातील संघटीत व असंघीटत क्षेत्रातील कामगारांच्या प्रलंबित विविध विषयां बाबतीत , कामगारांच्या विविध मागण्या सरकार कडे मांडणार आहे.

भारतीय मजदूर संघाच्या महत्वपूर्ण मागण्या-

असंघीटत कामगारां करिता सामाजिक सुरक्षा कोड त्वरित लागु करून सुरक्षा मंडळा मार्फत लाभ देण्यात यावा.

कंत्राटी कामगार पध्दत बंद करून तेथे कार्यरत रिक्त जागांवर कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांची कायम स्वरूपी नियुक्ती करावी, तसेच राजस्थान, आडिसा, हरियाणा, पंजाब राज्याप्रमाणे कंत्राटी कामगारांना कायम नोकरीत समाविष्ट करावे.

घरेलु कामगार कल्याण मंडळाचे काम व बांधकाम कल्याण मंडळामार्फत सुविधा, लाभ देण्यात यावेत.

अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स यांच्या मानधनात वाढ करून त्यांना सरकारी कर्मचारी घोषित करावे.

बिडी ऊद्योगातील कामगारांना किमान वेतना ची प्रभावीपणे अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी.

ई .पी. फ. पेंशन दरमहा रू ५००० करण्यात यावी व महागाई भत्ता देण्यात यावा.

राज्य सरकारी कर्मचारी करिता जुनी पेंशन योजना लागु करण्यात यावी.

पेट्रोल, डिझेल व गॅस यांना जी एस टी च्या कक्षेत आणुन महागाई वर नियंत्रण आणावे.
संरक्षण उद्योगांचे निगमीकरण मागे घेण्यात यावे.

बॅंक व एल .आय .सी. चे खाजगी करण मागे घेण्यात यावे.

महाराष्ट्रातील अनुसूचित ऊद्योगातील प्रलंबित किमान वेतन वाढ त्वरित घोषित करण्यात यावी.

भंडारा, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांना शासकीय नियमा प्रमाणे १५ % नक्षलग्रस्त भत्ता देण्यात यावा.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळातील सर्व कामगारांचे वेतन नियमीतपणे करण्यात यावे.

राज्यातील अभयारण्य मध्ये कार्यरत गाईडस कर्मचारांना शासन सेवेत नियमीत करावे.

या वेळी व्यासपीठावर भारतीय मजदूर संघाचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष शिल्पा देशपांडे, अखिल भारतीय उपाध्यक्ष नीता चोबे, महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे सरचिटणीस सचिन मेंगाळे, महाराष्ट्र विज कामगार महासंघाचे महादेव पराते, विदर्भ प्रदेश महिला प्रमुख सुहास तिवारी, कोयला संघटनेचे नागपूर विभाग संघटन मंत्री जयंत मुळे, बॅंक ऊद्योगातील संघटनेचे स्वेता लोखंडे , अंगणवाडी पदाधिकारी सुकेशनी रंगारी, वृशाली बागडे, प्रमिमा ऊके, सुरक्षा रक्षक संघटनेचे तिर्थराज बडमे , किशोर लांडे हे पदाधिकारी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमास विविध ऊद्योगातील पदाधिकारी प्रमुख उपस्थित होत कार्यक्रमाचे वर्धा जिल्हा मंत्री अमोल धनवीज, प्रास्ताविक उपाध्यक्ष राम गबाले यांनी केले आहे.

या नंतर आर्वी मध्ये संकल्प ज्योत प्रज्वलीत करून मोटार सायकल रँली काढली, याचे नेतृत्व महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे सचिन मेंगाळे, भारत जयसिंगपुरे, सुरज तडस, यांनी केले.
या कार्यक्रमाचे नियोजन जगनराव गाठे, महेंद्र गोमासे, अनुप खुने, ऊमेश झाडे, अमित ढोरे यांनी केले आहे.

Previous articleकंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय मजदूर संघ रस्त्यावर
Next articleवि.शे.सातव विद्यालयात भारतीय मानक ब्युरो (Bureau of Indian Standards (BIS) ची स्थापना