दुचाकी व टेम्पो अपघातात एक जणाचा जागीच मृत्यू नारायणगाव येथील घटना

नारायणगाव : (किरण वाजगे)

पुणे नाशिक महामार्गावरील नारायणगाव- वारूळवाडी ला जोडणाऱ्या मुख्य पुलावर दुचाकी व मेक्सिमो टेम्पो यांच्यात धडक होऊन दुचाकीस्वार चालवणाऱ्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दि १५ रोजी साय ७ वाजण्याच्या सुमारास घडली.

मनीष भालभद्र मेहता (वय ४३ रा कुबेर आंगण,कोल्हे मळा, नारायणगाव) असे या अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.या घटनेची फिर्याद निलेश हनुमंत जेजुरकर (रा शेटे मळा नारायणगाव) यांनी दिली.

पोलिसांनी मॅक्सिमो टेम्पोचा चालक विक्रम शंकर मोडवे ( वय ३३, रा येडगाव) याला ताब्यात घेतले आहे.

पोलिस सुत्रांनी मिळालेल्या माहितीनुसार मृत मनीष मेहता हे वारूळवाडी बाजूकडून नारायणगावच्या दिशेला त्यांच्या दुचाकी (क्र एम एच १४ जे क्यू २७९५) वरून येत होते. तर औषध वाहतूक करणारा छोटा मेक्सिमो टेम्पो क्रमांक एम एच १४ जी डी ५४७१ हा नारायणगाव वरुन वारूळवाडीच्या दिशेला चालला होता या दोन्ही गाड्या मीना नदी पुलावर आले असता दोघांमध्ये धडक झाली ही धडक इतकी जोरदार होती की मनीष यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना पुढील सोपस्कारासाठी नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेचा पुढील तपास नारायणगाव पोलीस करत आहेत.

Previous article२३ व्या आंतरराष्ट्रीय आंतरविद्याशाखीय परिषदेचे एस एम जोशी महाविद्यालयात आयोजन
Next articleकंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय मजदूर संघ रस्त्यावर