एस एम जोशी कॉलेजमध्ये शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर

दिनेश पवार : दौंड

लोकनेते व रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पद्मविभूषण खा. शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एस. एम. जोशी कॉलेजमध्ये सुवर्ण महोत्सवी योगदानाबद्दल कृतज्ञता सप्ताह अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

एन.सी.सी., एन.एस.एस. व हेल्थ सेंटर, नोबेल हॉस्पिटल ब्लड सेंटर व आपका डॉक्टर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.महाविद्यालयातील 104 विद्यार्थ्यांनी रक्तदान केले.जूनियर विभागाच्यावतीने निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. शिबिराच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आमदार चेतनदादा तुपे होते.विविधतेतून एकता जोपासू या कर्मवीरांचे समतेचे तत्व स्वीकारूया.एकसंघ भारत घडवण्यासाठी भारतीयत्व जोपासूया.असे विचार रक्तदान शिबिराच्या उद्घाटन समारंभात त्यांनी मांडले.

अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य दिलीप आबा तुपे होते. ते म्हणाले की, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे .युवकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीची भावना जोपासावी.असे ते म्हणाले.दिल्या.प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एन.एस.गायकवाड यांनी केले. आभार डॉ.अशोक पांढरबळे यांनी मानले.

Previous articleहवेली तालुका देखरेख सहकारी संघाच्या अध्यक्षपदी प्रशांत दत्तात्रय काळभोर तर उपाध्यक्षपदी जितेंद्र कोंडे यांची निवड
Next articleपेरणे ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचारात श्री.सिध्देश्वर पाचपीर महाराज ग्रामविकास पँनेलची आघाडी