पेरणे ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचारात श्री.सिध्देश्वर पाचपीर महाराज ग्रामविकास पँनेलची आघाडी

गणेश सातव,वाघोली

पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या पेरणे गावची पंचवार्षिक निवडणूक येत्या रविवार,दि.१८ डिसेंबर रोजी पार पडत आहे.पुणे-नगर महामार्गालगत भीमानदी तीरावर वसलेले,शेती व उद्योग प्रधान असलेले,नेहमी ऐतिहासिक,राजकीय व सामाजिक चर्चेत असणारे हे गाव आहे.एकूण ६ वार्ड व १७ सदस्य संख्या असणारी पुर्व हवेलीतील मोठी ग्रामपंचायत म्हणून पेरणे गावची परिसरात ओळख आहे.

‘सरपंचपद’ हे नागरिकांचा ईतर मागासवर्ग(ओ.बी.सी)महिला या करिता राखीव असून या पदाकरिता पँनेलच्यावतीने सौ.उषा दशरथ वाळके यांना अधिकृत उमेदवारी मिळाली आहे. निवडणूक मतदानासाठी ‘नारळ’ हे त्यांचे चिन्ह आहे

वार्ड क्र.५ मध्ये गावठाण, खडकवस्ती,श्रीनाथनगर,पोल फँक्टरी परिसर, वाघमारे वस्ती हा भाग समाविष्ट आहे.या वार्डात पँनेलच्यावतीने गावातील प्रत्येक कार्यात क्रियाशील सहभाग घेणारे,धार्मिक व जातीय सलोखा जपणारे,युवकांना उद्योग क्षेत्रात प्रेरित करणारे युवा उद्योजक श्री.सुजय सुदाम वाळके त्याचबरोबर सोबत सौ.अलका मोहन वाळके व सौ.पुनम राहुल गुंडकर यांना सर्वसाधारण गटात उमेदवारी देण्यात आली आहे.

श्री.सुजय वाळके यांचे चिन्ह ‘हेलिकॉप्टर’ तर,सौ.अलका मोहन वाळके यांचे चिन्ह ‘छताचा पंखा’ असून सौ.पुनम राहुल गुंडकर यांचे चिन्ह ‘बँट’ आहे.

पेरणे गावचे ग्रामदैवत नायगाव (ता-पुरंदर) येथील श्री.सिध्देश्वर महाराज यांच्या चरणी प्रचाराचा नारळ अर्पण करुन,गावात प्रचार शुभारंभ सभेच्या माध्यमातून रविवारी प्रचाराला दिमाखदार सुरुवात करण्यात आली आहे.

आगामी काळात गावठाण व इतर वार्डातील रस्ते,ड्रेनेज लाईन,वीज दिवे,आरोग्य सेवा,गाव परिसरातील शेतीचे पानंद रस्ते,गावातील शाळा,विद्यालय,महिला सक्षमीकरण त्याचबरोबर गावातील तरुणांसाठी परिसरातचं उद्योगक्षेत्राची उभारणी करुन रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

तरी येत्या रविवार, दि.१८ डिसेंबर २०२२ रोजी पार पडणाऱ्या निवडणूक मतदान दिनी सर्व मतदार बंधु-भगिनींनी नारळ,हेलिकॉप्टर, छताचा पंखा व बँट या चिन्हा समोरील बटन दाबून श्री.सिध्देश्वर पाचपीर महाराज ग्रामविकास पँनेलच्या सर्व उमेदवारांना मतदान करुन बहुमताने निवडून आणावे असे आवाहन पँनेलचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Previous articleएस एम जोशी कॉलेजमध्ये शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर
Next articleपेरणे ग्रामपंचायतीच्या वार्ड क्रं ५ मध्ये श्री.सिध्देश्वर पाचपीर महाराज ग्रामविकास पँनेलच्या उमेदवारांना मतदारांचा वाढता पाठिंबा