हवेली तालुका देखरेख सहकारी संघाच्या अध्यक्षपदी प्रशांत दत्तात्रय काळभोर तर उपाध्यक्षपदी जितेंद्र कोंडे यांची निवड

उरुळी कांचन

हवेली तालुका देखरेख सहकारी संघाच्या अध्यक्षपदी प्रशांत दत्तात्रय काळभोर यांची तर उपाध्यक्षपदी जितेंद्र राजाराम कोंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली नुकतीच संघाची निवणूक बिनविरोध संपन्न झाली.

यामध्ये संचालक म्हणून मिलापचंद धनाजी गायकवाड, वसंत सोपानराव जगताप, कल्याण अंकुश शिंदे, सुभाष सदाशिव टकले व लक्ष्मण बबनराव माताळे यांची निवड करण्यात आली होती.

यावेळी बोलतांना हवेली तालूक्यातील शेतकरी सभासदांना लवकर व सुलभ कर्जपुरवठा व्हावा तसेच सचिव व विकास सोसायटीत संचालक मंडळ यांचेमध्ये समन्वय साधून कामकाज मध्ये सुसूत्रता आणण्यासाठी व तालु्क्यातील विकास सोसायटी मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रशांत काळभोर यांनी सांगितले.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रताप गायकवाड, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विकास दांगट, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे संचालक प्रदीप कंद, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती दिलीप काळभोर, पिडीसीसी संचालक प्रवीण शिंदे, शिवसेना जिल्हा प्रमुख माऊली कटके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जगताप, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे कार्यकारणी सदस्य रोहिदास उंद्रे, महात्मा गांधी सर्वोदय संघाचे खजिनदार राजाराम कांचन, साधना बँकेचे संचालक विकास तुपे, वडगांव शेरी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष राजेंद्र खांदवे, महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस जेष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष सोनबा चौधरी, नितीन पाटील, साधना बँक संचालक प्रताप बोरकर, सुभाष काळभोर, जि.प. माजी सदस्य लक्ष्मण केसकर, संजय गायकवाड, हवेली खरेदी विक्री संघ अध्यक्ष दत्ताभाऊ पयगुडे उपस्थित होते.

Previous articleकै.दत्तात्रय गाडेकर गुरुजी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत खाऊचे वाटप
Next articleएस एम जोशी कॉलेजमध्ये शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर