नारायणगाव-खोडद ते शिर्डी साईबाबा पालखी सोहळ्याचे भोरवाडीमध्ये उत्साहात स्वागत

नारायणगाव (किरण वाजगे)

श्री. निर्विघ्न साई मंदिर खोडद (ता.जुन्नर) आयोजित खोडद ते शिर्डी भव्य पायी वारीतील सुमारे ५५० वारकऱ्यांच्या पायी वारी पालखी सोहळ्याचे सलग १८ व्या वर्षी भोरवाडी, वडगाव (कांदळी) येथे भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले.

साईभक्त सागर दहितुले यांच्या निवासस्थानी या पालखी सोहळ्याचे आगमन झाले.दहितुले यांच्या वतीने सर्व भाविकांना अल्पोपहार देण्यात आला. त्यानिमित्ताने भोरवाडीत जणू शिर्डी अवतरल्याची अनुभूती पदोपदी येत होती, अतिशय भक्तिमय, भावपूर्ण वातावरणात साई पालखी आणि पायी वारीतील वारकऱ्यांची विघ्नहर साऊंड च्या वतीने डॉल्बी लावून भोरवाडी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ व महिला भगिनींच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढण्यात आली, त्यानंतर सागर दहितुले यांच्या निवासस्थानी साईबांची विधीवत पूजा करून महाआरती करून पालखी सोहळ्यातील वारकरी आणि परिसरातील ग्रामस्थासाठी रविंद्रशेठ सोनवणे यांनी चहा पाणी नाश्त्याची सोय केली, वारकऱ्यांसाठी विघ्नहर मंडप अँड साऊंड चे गणेश शिंदे आणि विघ्नहरभाऊ काळे यांनी सुनियोजन केल्याने वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

या वेळी पालखी सोहळ्याचे प्रमुख गुंडीराज थोरात यांचा सन्मान माजी सरपंच माऊली निलख, ग्रा. प. स. वैशाली शिंदे, शांताराम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश शिंदे यांनी केले.आभार निर्विघ्न साई मंदिर खोडद – मांजरवाडी चे अध्यक्ष जयंत नलावडे यांनी मानले.

Previous articleकामगारांना त्रास देणाऱ्या कंत्राटदारावर खटला दाखल
Next articleशिवजन्मभूमी  फाऊंडेशनच्या वतीने नारायणगाव – शिर्डी सायकलवारी टीम, पहाटवारा स्विमिंग ग्रूपच्या वतीने जुन्नर तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान