कामगारांना त्रास देणाऱ्या कंत्राटदारावर खटला दाखल

कुरकुंभ, सुरेश बागल

महावितरण मधील नियमित मंजूर रिक्त पदांच्या विविध जागेवर कंत्राटदार ऑल ग्लोबल सर्व्हिसेस या गोरेगाव मुंबई च्या एजन्सीने च्या वतीने पुणे,कोल्हापूर,पनवेल,भांडुप, रत्नागिरी येथे कामगार पुरवले होते.

सदर एजन्सी कधीच कामगार कायद्याचे वा नियमाचे पालन करत नाही, कामगारांना PF ESIC पेमेंट स्लीप व अन्य सुविधा सूरक्षा साधने वेळेत आजवर कधी पुरवली नाही त्या मुळे त्यांचे लायसन रद्द करून काळ्या यादीत टाकण्यासाठी महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) संघटनेने अनेक आंदोलने केली.

८ ऑगस्ट २०२२ रोजी खटला भरू या दिलेल्या आश्वासनाची पूर्तता कामगार उपआयुक्त कार्यालयाकडून झाली नसल्याने भारतीय मजदूर संघ संलग्नीत महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने सोमवार दि. २८ नोव्हेंबर रोजी कामगार उप आयुक्त कार्यालय वाकडेवाडी पुणे येथे आमरण उपोषण सुरू केले होते.

कामगारांना वेळेवर वेतन न देणे, रोजगारा साठी पैश्याची मागणी करणे, पैसे न दिल्यास कामावरून कमी / बदली करण्याची बदली धमकी देणे, कोर्ट संरक्षित कामगारांना कामावरून कमी करणे तशा ऑर्डर देणे या बाबीमुळे कामगार आक्रमक झाले त्यामुळे सदर एजन्सीवर खटला दाखल न झाल्यास २९ नोव्हेंबरला कामगार उप आयुक्त कार्यालयास टाळे ठोकून काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेने दिला त्यांनतर पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात आस्थापणावर वर खटला दाखल करण्यात आला व या बाबत संघटनेला लेखी स्वरूपात दिल्यानंतर संघटनेने आमरण उपोषण मागे घेतले.

महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे उपमहामंत्री राहुल बोडके,पुणे झोन सचिव निखिल टेकवडे,महेश वाघमारे, सुधीर शेंडगे यांनी उपोषण केले संघटनेचे अध्यक्ष निलेश खरात, कोशाध्यक्ष सागर पवार व भारतीय मजदूर संघाचे पुणे अध्यक्ष अर्जुन चव्हाण,पूर्ण वेळ कार्यकर्ते उमेश विश्वाद,नीलेश गादगे यांनी मार्गदर्शन केले.कामगारांना प्रोत्साहन देण्यासाठी भोसरीचे अध्यक्ष मोहन भोसले, ईश्वर स्वामी,अविनाश जगताप,सूरज चव्हाण उपस्थित होतेवीज कामगार महासंघाचे पुणे झोन अध्यक्ष माने यांनी सद्दीच्छा भेट दिली.

मा.कामगार उप आयुक्त मा.श्री.अभय गीते यांनी कारवाई केली.पुण्या प्रमाणे सदर एजन्सीवर कोल्हापूर मध्येही खटला दाखल झाला पाहिजे अशी भूमिका संघटनेने मा.अप्पर कामगार आयुक्त पुणे मा.शैलेंद्र पोळ यांच्या पुढे मांडली असता त्यांनी तात्काळ कोल्हापुरातील मा.कामगार उप आयुक्त यांना फोनवर सूचना दिल्या.

Previous articleमहाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे बेमुदत उपोषण तात्पुरते स्थगित सर्वच मागण्यां संदर्भात झाली सकारात्मक चर्चा
Next articleनारायणगाव-खोडद ते शिर्डी साईबाबा पालखी सोहळ्याचे भोरवाडीमध्ये उत्साहात स्वागत