शिवजन्मभूमी  फाऊंडेशनच्या वतीने नारायणगाव – शिर्डी सायकलवारी टीम, पहाटवारा स्विमिंग ग्रूपच्या वतीने जुन्नर तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान

नारायणगाव : (किरण वाजगे)
संपूर्ण उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये सातत्याने सामाजिक धार्मिक व क्रीडा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शिवजन्मभूमी फाऊंडेशनचे कार्य उल्लेखनीय असल्याचे मत ज्येष्ठ रोटरियन व सामाजिक कार्यकर्ते जे.एल.वाबळे यांनी केले नारायणगाव येथे आयोजित केलेल्या सन्मान सोहळ्यात श्री वाबळे बोलत होते.

शिवजन्मभूमी फाऊंडेशन, पहाटवारा स्विमिंग गृप नारायणगाव ते शिर्डी सायकलवारी टीमतर्फे जुन्नर तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा नारायणगाव येथे विशेष गौरव व सन्मान करण्यात आला. यामध्ये शिवजन्मभूमी ते कन्याकुमारी सोलो सायकलिंग केलेल्या सुधाकर लोंढे, भारताचे पाश्चिम ते पूर्व टोक सायकलिंग करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकोर्ड करणा-या प्रिती म्हस्के,भारत धाम यात्रा करणारे हभप अंकुश महाराज मोरे, राज्य विक्रिकर निरीक्षकपदी राज्यात प्रथम आलेले विवेक वायकर,१२ तास वीस मिनिटे सलग कीर्तन गायन वर्ल्ड रेकोर्ड करणारे हभप किरण महाराज बनकर, सलग २२ वर्ष आळंदीस पायी जाणाऱ्या सर्व पालख्यांची सेवा करणारे रामशेठ दळवी, साई मंदिराला ११ गुंठे जागा मोफत देणारे गिरीश विनायक रसाळ, पंजाब येथील जगप्रसिद्ध संतश्रेष्ठ नामदेव महाराज नगरी घुमान पर्यंत सायकल प्रवास केल्या बद्दल मारुती कडाळे, हिराबाई बाजीराव कानवडे, राजगुरूनगर बँकेचे नवनिर्वाचित तज्ञ संचालक दीपक वारूळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते जे.एल. वाबळे, दिपक वारूळे, जितेंद्र गुंजाळ, बाळासाहेब शेलोत, उद्योजक अशोक खांडगे, रविंद्र वाघुले, डॉ. बंगाळ,डॉ घाडगे, संपत शिंदे, शरद दरेकर, पोलीस उप निरीक्षक पाटील यांच्या हस्ते मान्वरांना सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन शिवजन्मभूमी फौंडेशन चे अध्यक्ष धनंजय माताडे, अभिजित शेटे, सुनिल इचके, संदेश शिंदे, हरिओम ब्रम्हे, रूतिक गुंजाळ, ऋतिक माताडे, पवन घोलप,राजू भोरे आदींनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ सत्यवान थोरात यांनी केले आभार धनंजय माताडे यांनी मानले.

Previous articleनारायणगाव-खोडद ते शिर्डी साईबाबा पालखी सोहळ्याचे भोरवाडीमध्ये उत्साहात स्वागत
Next articleगीता जयंती निमित्त भोंडे हायस्कूलच्या १५०० विद्यार्थ्यांनी केले भगवदगीतेचे पठण