पाटस-कुसेगाव रस्त्यावर ट्रकने दुचाकीला चिरडले; आई- वडिलांसह चिमुकल्याचा जागीच मूत्यू

योगेश राऊत,पाटस

पाटस- कुसेगाव रस्त्यावर एका ट्रकने दुचाकीला पाठीमागून चिरडल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. २) सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात आई-वडिलांसह एका चिमुकल्याचा जागीच मूत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पाटससह परिसरात शोककळा पसरली आहे.

संतोष सदाशिव साबळे ( वय अंदाजे ३६ ) पत्नी – रोहिणी संतोष साबळे आणि मुलगा गुरू संतोष साबळे (वय – ५, सर्व रा. पाटस ता. दौड जि. पुणे) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण

पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष साबळे हे त्यांची पत्नी रोहिणी व मुलगा गुरू यांना घेऊन दुचाकीवरून कुसेगाव कडून पाटसच्या दिशेने चालले होते. पाटसकडे जात असताना त्यांच्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली.

या अपघातात आई व वडील हे जागेवर मयत झाले. तर मुलगा गुरू हा गंभीर जखमी होता. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याचाही उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, यवत पोलीस , ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास यवत पोलीस करीत आहेत.

Previous articleभोसे येथे खेड तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत १५० संघांचा सहभाग
Next articleउरुळी कांचन ते सौरंगा मोटारसायकल तीर्थयात्रा