भोसे येथे खेड तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत १५० संघांचा सहभाग

चाकण – भोसे (ता .खेड) येथील मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोसे प्रशालेच्या क्रीडांगणावर १४ , १७ व १९ वर्षाखालील खेड तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत तालुक्यातील तीनही गटातील मुला- मुलींचे एकूण १५० संघ सहभागी झाले होते . अशी माहिती खेड तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष रामदास रेटवडे यांनी दिली .

जिल्हा क्रीडा परिषद , जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे ,खेड तालुका क्रीडा अधिकारी व खेड तालुका क्रीडा शिक्षक संघटना व मॉडर्न हायस्कूल भोसे यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा २८ नोव्हेंबर व २९ नोव्हेंबर २०२२ रोजी आयोजित केली होती . स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस वितरण प्रसंगी मयुर मोहिते,भोसे गावचे सरपंच विजय काळे ,उपसरपंच रोहिणीताई पिंगळे,माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचाय सदस्य दिगंबर लोणारी,विश्वास गांडेकर ,सर्व ग्रामपंचायत सदस्य, मॉडर्न हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सतीश गवळी, ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब बिंदले ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विकास गांडेकर ,उपाध्यक्ष दिगंबर कुटे सर्व सदस्य ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोसे सर्व शिक्षक वृंद ,मॉडर्न हायस्कूल भोसे सर्व शिक्षक वृंद ,समस्त ग्रामस्थ मंडळी भोसे यांनी उपस्थित राहून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:
१४ वर्ष वयोगट (मुले) – प्रथम क्रमांक :जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोसे , द्वितीय माध्यमिक विद्यालय पाडळी , तृतीय एस.एन. इंग्लिश स्कूल चाकण
१४ वर्ष वयोगट (मुली) – प्रथम क्रमांक :माध्यमिक विद्यालय पाडळी , द्वितीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोसे , तृतीय रामभाऊ म्हाळगी विद्यालय कडूस
१७ वर्ष वयोगट (मुले) – प्रथम क्रमांक :माध्यमिक विद्यालय पाडळी , द्वितीय शिवाजी विद्यामंदीर चाकण , तृतीय भैरवनाथ विद्यालय करंजविहीरे
१७ वर्ष वयोगट (मुली) – प्रथम क्रमांक : मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय भोसे , द्वितीय शिवाजी विद्यामंदीर चाकण , तृतीय रामभाऊ म्हाळगी विद्यालय कडूस
१९वर्ष वयोगट (मुले) – प्रथम क्रमांक : मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय भोसे , द्वितीय श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेलपिंपळगाव , तृतीय पी के कॉलेज चाकण .
१९वर्ष वयोगट (मुली) – प्रथम क्रमांक : श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चाकण , द्वितीय पीके कॉलेज चाकण , तृतीय हुतात्मा राजगुरु महाविद्यालय खेड .
वडकी पुणे येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाने प्राविण्य मिळविलेल्या संघांची निवड झाली आहे .

खेळाडूंनी रचला इतिहास
खेड तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत भोसे गावातील खेळाडूंनी वर्चस्व राखत मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय भोसे येथील विद्यार्थ्यांनी १९ वर्ष वयोगट मुले व १७ वर्षे वयोगट मुलींच्या संघाने विजेतेपद पटकावले .
तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोसे प्रशालेच्या खेळाडूंनी १४ वर्षे वयोगटात मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक व १४ वर्ष वयोगट मुलींच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळविला .

Previous articleमराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकारांसाठी वैद्यकीय तपासणी शिबिर
Next articleपाटस-कुसेगाव रस्त्यावर ट्रकने दुचाकीला चिरडले; आई- वडिलांसह चिमुकल्याचा जागीच मूत्यू