उरुळी कांचन ते सौरंगा मोटारसायकल तीर्थयात्रा

उरुळी कांचन
मार्गशिर्ष महिना हा बारा महिन्यापैकी उत्तम प्रकाराचा म्हणून मानला जातो. परब्रम्ह श्री दत्तात्रेय प्रभु याचा जन्म याच महिन्यात असल्याकारणाने त्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. यांच अनुषंगाने उरुळी कांचन येथील श्रीकृष्ण मंदिर पासून मोटारसायकल तीर्थयात्रा खेड तालुक्यातील पेठ याठिकाणच्या डोंगरावर असलेल्या श्री दत्त मंदिर सुवर्णगड सौरंगा काढण्यात आली होती. याठिकाणी अनेक सदभक्त भक्ती भावपुर्ण श्रध्देने याठिकाणी येऊन दर्शन घेतात व भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात.

यावेळी मोटारसायकल तिर्थस्थान दर्शन यात्रेचे आयोजन सुबोधमुनी धाराशिवकर बाबा यांनी केले होते. यावेळी बापु कांचन, उत्तम चौधरी, संजय कांचन, विलास तांबे, गोकुळ मुरकुटे, दत्तात्रय चौधरी, रामभाऊ कांचन, राजु कांचन, लाला कांचन, संजय चौधरी, हरिभाऊ ढावारे, आबा मुरकुटे, राजेंद्र घुले, बाळु ढावारे आदीनी दर्शनाचा लाभ घेतला.

Previous articleपाटस-कुसेगाव रस्त्यावर ट्रकने दुचाकीला चिरडले; आई- वडिलांसह चिमुकल्याचा जागीच मूत्यू
Next articleप्रताप  कांचन यांची युवा सेना हवेली तालुका प्रमुखपदी निवड