महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करणे ही खेदजनक बाब-विक्रम पवार

दिनेश पवार:दौंड

महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांवर शासनाने गुन्हे दाखल करणे ही बाब खेदजनक व निंदनीय आहे,असे मत अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हा सरचिटणीस विक्रम पवार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले, अखिल भारतीय मराठा महासंघ दौंड च्या वतीने महाराष्ट्राविषयी बेताल वक्तव्य करणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री व कर्नाटक शासनाचा दौंड मध्ये निपाणी-संभाजी नगर ही बस अडवून जय महाराष्ट्र लिहून निषेध व्यक्त करण्यात आला होता, यामुळे आंदोलनकर्त्यावर दौंड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले,यामुळे अखिल भारतीय मराठा महासंघ दौंड शहर व तालुका यांच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती,.

यावेळी विक्रम पवार म्हणाले की 1986 साली सुद्धा महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांवर कर्नाटक सरकारने गुन्हे दाखल केले होते,अशीच परिस्थिती आज महाराष्ट्र शासनाने निर्माण केली आहे ही बाब अत्यंत निंदनीय असून याबाबत समाजातून संताप व्यक्त केला जात आहे,शासनाकडून कार्यकर्त्यांवर दाखल केलेले गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावेत अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हा सरचिटणीस विक्रम पवार यांनी व कार्यकर्त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.

Previous articleसामाजिक कार्यकर्ते ,साहित्यिक डॉ.अनिल सांगळे यांंना “कार्यसम्राट” राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
Next articleमुंबई येथे राज्यस्तरीय युवा संसद उत्साहात संपन्न