सामाजिक कार्यकर्ते ,साहित्यिक डॉ.अनिल सांगळे यांंना “कार्यसम्राट” राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

श्रावणी कामत,लोणावळा

“प्रितगंध फाऊंडेशन मुंबई” संस्थेच्या सातव्या वर्धापन दिनी मान्यवरांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते साहित्यिक मा.डॉ. अनिल सांगळे यानां “कार्यसम्राट” हा राज्यस्तरीय पुरस्कार थाटात प्रदान करण्यात आला.

संस्थेचे अध्यक्ष श्री.संतोष महाडेश्वर तसेच प्रमुख पाहुणे उद्घाटक एलीट मिसेस क्वीन ऑफ द वर्ल्ड आणि मिसेस इंडिया युनिव्हर्स विजेत्या डाॅ.सोनाली वनमाळी, कवयित्री,शिक्षणतज्ञ,
कौन्सिलिंग सायकॉलॉजिस्ट डाॅ.अलका नाईक, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.संतोष तावडे, इतिहास संशोधक डॉ. शीतलताई मालुसरे इ. मान्यवर उपस्थित होते.

भारत देशातील सन्माननीय समाज शास्रज्ञ, लेखक,राष्ट्रीय समाज भूषण तथा मार्गदर्शक अशा सर्वांगीन सर्वोत्कृष्ठ समाजकार्यात अमुल्य व अतुलनीय कामगिरी करणा-या विविध क्षेत्रातील प्रतिभासंपन्न व्यक्तीनां हा अतिशय प्रतिष्ठीत समजला जाणारा “कार्यसम्राट पुरस्कार देण्यात येतो.
सन्मानपत्र ,शाॕल ,सन्मानचिन्ह,असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

अखंड भारतभूमीचे आम्ही सदैव हृणी आहोत.प्रितगंध फाऊंडेशन भविष्यात नक्कीच जग पातळीवर काम करेल नावलौकीकास येईल , आणिसमाजाची निस्वार्थपणे केलेली सेवा आज फळास आली,हे आमचे परम भाग्य आहे.असे मत मा.डॉ.अनिल सांगळे यानी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.कवयित्री सौ.सुरेखाताई प्रकाश शिरसाठ(पुणे) यांचा सन्मान सुद्धा त्यानीच स्विकारला. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आवर्जून उपस्थिती दर्शवली.

Previous articleखुटबावच्या विद्यार्थिनींची कुस्ती स्पर्धेमध्ये यशस्वी कामगिरी
Next articleमहाराष्ट्राच्या अस्मितेसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करणे ही खेदजनक बाब-विक्रम पवार