मुंबई येथे राज्यस्तरीय युवा संसद उत्साहात संपन्न

मुंबई येथे नुकतीच राज्यस्तरीय युवा संसद पार पडली यात आंबेगाव तालुका प्रतिनिधी आशुतोष येवले आणि खेड तालुका प्रतिनिधी बजरंग बोरकर यांनी सहभाग नोंदवला.यामध्ये आशुतोष येवले यांच्याकडे रेल्वे रोड ट्रान्सपोर्ट आणि हायवे हे खाते देण्यात आले होते तसेच बजरंग बोरकर यांनी खासदार म्हणून पद भूषविले.

यात प्रत्यक्ष संसद जशी चालविली जाते तशा स्वरूपात प्रत्यक्ष संसदेचे कामकाज चालविले गेले यात विरोधी पक्ष नेते मंत्री प्रधानमंत्री असे सर्व भाग सामील होते यात महाराष्ट्रातून 72 लोकांची निवड केली गेली होती.
सदरील कार्यक्रम दोन दिवस चालला गेला पहिल्या दिवशी विधान भवन विधानपरिषद अशा भावनांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील माहिती जाणून घेतली त्यानंतर राजभवन या ठिकाणी राज्यपाल महोदयांचे निवासस्थान दाखवण्यात आले.

दुसऱ्या दिवशी राज्यपाल भगतसिंग कोषारी यांच्या हस्ते युवा संसद या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले व युवा संसदेला सुरुवात झाली जसे संसदेचे काम पार पडते तसेच हेही काम पार पडले.कार्यक्रमाच्या शेवटी युवा संसद पुरस्कार देण्यात आला व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Previous articleमहाराष्ट्राच्या अस्मितेसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करणे ही खेदजनक बाब-विक्रम पवार
Next articleहोम मिनिस्टर फेम उत्तम निवेदक संदेश चौधरी यांना राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनात पुरस्काराने सन्मानित