टाकळकरवाडीत खेड बिटाच्या यशवंतराव चव्हाण कला क्रीडा सांस्कृतिक स्पर्धा संपन्न

राजगुरूनगर- टाकळकरवाडी( ता.खेड) येथे ज्ञानेश्वर गणपत टाकळकर् विद्यालय आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळकरवाडी येथे यशवंतराव चव्हाण कला, क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा संपन्न झाल्या. स्पर्धेचे उद्घाटन श्री कैलासराव टाकळकर ज्ञानेश्वर ग.टाकळकर विद्यालयाचे अध्यक्ष, श्री सुरेशभाऊ टाकळकर शा .स अध्यक्ष, श्री कारभारी टाकळकर उपसरपंच टाकळकरवाडी,सुचित्रा टाकळकर शा.व्य.स सदस्य, लक्ष्मण बोऱ्हाडे व्य.स.सदस्य जऊळके खु, श्री दत्तात्रय गोसावी केंद्रप्रमुख टाकळकरवाडी, श्रीम कल्पना टाकळकर केंद्रप्रमुख तुकईभांबुरवाडी ,श्री बाळासाहेब गावडे केंद्रप्रमुख कनेरसर,श्री किरण तांबे केंद्रप्रमुख गुळाणी,डी.टी मांजरे मुख्याध्यापक ज्ञा.ग.विद्यालय टाकळकरवाडी यांच्या हस्ते करण्यात आले.

वैयक्तिक स्पर्धेत लहान गट,मोठा गट मुला मुलींच्या धावणे, उंच उडी, लांब उडी, गोळा फेक,थाळी फेक अशा स्पर्धा घेण्यात आल्या.सांघिक स्पर्धेत कबड्डी, खोखो, लेझीम अशा स्पर्धा घेण्यात आल्या.तर सांस्कृतिक स्पर्धेत भजन आणि लोकनृत्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या.
सदर स्पर्धांचे नियोजन चारही केंद्राचे केंद्रप्रमुख यांनी केले होते. नियोजनबद्ध पद्धतीने संपूर्ण स्पर्धा पार पाडल्या.

बक्षीस वितरण मा.श्री जीवन कोकणे साहेब गटशिक्षणाधिकारी तसेच चारही केंद्रप्रमुख यांच्या हस्ते करण्यात आले.कोकणे साहेबांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन केले. स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना ट्राफी आणि सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात आले.ट्रॉफीचे सौजन्य श्री मसुडगे सर आणि श्री बबन वाळके सर यांनी दिले.

स्पर्धा पार पाडण्यासाठी विशेष सहकार्य शितोळे सर,पिंगळे सर,कडलग सर,काळे सर,मावळे सर,राळे सर,नेहरे सर,बैरागी सर,हांडे सर,रेटवडे सर,आदक सर,काळुराम ठाकूर सर,यानभुरे सर,तसेच खेड बिटातील मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक या सर्वांचे लाभले. पंच म्हणून काम करणाऱ्या सर्व शिक्षकांनी चोख काम पार पाडले.

Previous articleअतिक्रमणांबाबत लढा देणार – सरपंच परिषद उपाध्यक्ष शशिकांत मोरे
Next articleशिरूर लोकसभा मतदारसंघातील  विकासकामांना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची मंजुरी: खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सुचविलेली १७.१९ कोटींची कामे मंजूर