महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांच्या नियोजन विभागाच्या अधिकार्‍यांचा टेकवडी गावाला अभ्यास दौरा

राजगुरूनगर –  टेकवडी गावाला महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांच्या नियोजन विभागाचे 46 पदाधिकारी आणि यशदा संस्थेचे अधिकारी यांनी भेट दिली. यशदा संस्थेचे श्री विनय कुलकर्णी आणि श्री विजय चव्हाण यांच्या माध्यमातून हा क्षेत्रीय भेट अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता, पर्याय प्रतिष्ठान चे अध्यक्ष आणी यशदा चे राज्यस्तरीय प्रविण प्रशिक्षक श्री वामन बाजारे यांनी भेटीचे नियोजन केले.गाव भेटी दरम्यान अधिकार्‍यांनी गावातील झालेल्या पथदर्शी प्रकल्पांचे कौतुक केले आणि भविष्यात होणार्‍या गावच्या विकासकामांसाठी मोलाचे मार्गदर्शन देखील केले. गावकरी ग्रामस्थ आणि महिला भगिनींनी पाहुण्यांचे केले आनंदाने स्वागत गावकऱ्यांच्या स्वागताने, महिला बचतगटाच्या गावरान चटकदार जेवणाने आणि गावच्या निसर्गरम्य परिसर पाहून पाहुणे गेले भारावून, गावच्या आदर्श पथदर्शी कामांमुळे टेकवडी गावचा नावलौकिक राज्यभर होणार असल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला

यावेळी 1). फाटय़ावर आकर्षक बसथांबा 2). रस्त्याच्या दुतर्फा झाडे 3). गावची अंगणवाडी आणि प्राथमिक शाळा 4). टेली मेडिसिन सेंटर 5). पिण्याच्या पाण्यासाठी -2 वॉटर ATM 6) व्यायामशाळा 7) ग्राम देवतांची मंदिरे 8) लहान मुलांची बाग 9) सोलर हायमास्ट 10) 30 कुटुंबांना आधुनिक बायोगॅस 11) गावच्या माळावर 4000 वनौषधींची लागवड 12) 0 लाईट बिल 24 पिण्यासाठी पाणी पुरवठा करणारा सोलर पंप 13) नवीन प्रस्तावित प्रकल्प 14) गावातील महिला बचत गट 15) दुग्ध व्यावसायिक स्पर्धा 16) व्यसनं मुक्त करण्यासाठी बक्षीस 17) गावातील वारकरी संप्रदाय 18) गावच्या लोकांचे राहणीमान19) जल विहार करण्यासाठी होडी 20) वीज विरोधक पोल 21) तंटामुक्त गाव 22) 25 वर्ष बिनविरोध ग्रामपंचायत निवडणूक 23) गावात काम करणाऱ्या विविध सामाजिक संस्था अशा अनेक गोष्टीची पाहणी करण्यात आली.

गावचे सरपंच श्री विठ्ठलभाऊ शिंदे यांनी गावांबद्दल सविस्तर माहिती दिली, उपसरपंच श्री ज्ञानेश्वर बेंडुरे आणि ग्रामपंचायत सदस्य श्री ज्ञानेश्वर पवार, सौ दिपाली शिर्के, श्रीमती सीमाताई ससाणे गावचे ग्रामस्थ श्री शांताराम बेंडुरे, संपत बेंडुरे, शंकर बेंडुरे श्री कैलास बेंडुरे, श्री नवनाथ भालेराव, श्री गबाजी बेंडुरे ,श्री पारु कावडे आणि महिला भगिनी उपस्थित होत्या

Previous articleयवत येथे शेतकरी कृषी महोत्सवाचे जिल्हाप्रमुख महेश दादा पासलकर यांच्या हस्ते उद्घाटन
Next articleफसवणूक करणाऱ्यांवर कारवाईची मागणी ; केडगावच्या नोंदणी कार्यालयातील प्रकार