यवत येथे शेतकरी कृषी महोत्सवाचे जिल्हाप्रमुख महेश दादा पासलकर यांच्या हस्ते उद्घाटन

योगेश राऊत ,पाटस

दौंड तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दौंड तालुक्यातील शेतकरी कृषी महोत्सव महिला बचत गट या भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी दि,१४ पासुन ते १७ रोजी पर्यंत होणार आहे, हिंदुहृदयसम्राट,शिवसेना प्रमुख वंदनीय स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त, शिवसेना दौंड विधानसभा व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख मा महेशदादा पासलकर विचारमंच यांच्या वतीने या भव्य दिमाखदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दौंड तालुका शेतकरी कृषी महोत्सव २०२२” चे सोमवार दि. १४ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.या कृषी महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाप्रमुख माननीय महेश दादा पासलकर यांच्या हस्ते करण्यात आले, या वेळी दौंड तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, मौजे यवत येथे कृषी महोत्सवात शेतकऱ्यांना एकाच वेळी व एकाच जागी कृषी, कृषी औजारे, विविध बियाणे, ऑटोमोबाईल, गृह उपयोगी वस्तू, नवीन तंत्रज्ञान, लहान मुलांसाठी मनोरंजनाची साधने, महिला बचत गट गृहोपयोगी वस्तूचे प्रदर्शन इ. क्षेत्राशी निगडित आधुनिक तंत्रज्ञानाची माहीती मिळावी या उद्देशाने दौंड तालुक्यात प्रथमच या कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

शेती व इतर क्षेत्रातील उद्योगांचा विकास व्हायचा असेल तर त्याच्याशी निगडीत आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती शेतकरी व इतर वर्गांना असणे गरजेचे आहे ही गरज लक्षात घेता ग्रामीण भागात प्रथमच शिवसेनेच्या वतीने या भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी यवत पंचक्रोशीतील मान्यवर यवत ग्रामपंचायत विद्यमान उपसरपंच सुभाष यादव, शिवसेना विभागप्रमुख हनुमंत निगडे यवत शिवसेना शाखा अध्यक्ष अशोक दोरगे, दौंड तालुका शिवसेना युवक उपप्रमुख शुभम माळवे यवत ग्रामपंचायत विद्यमान सदस्य व माजी उपसरपंच नामदेव दोरगे, दोन काँग्रेस विधानसभा अध्यक्ष विठ्ठल दोरगे, यवत वि का सो चेअरमन रमेश यादव, सचिन दोरगे, डॉ संतोष बेडेकर, चंद्रकांत दोरगे, आण्णा दोरगे, प्रशांत खराडे रोहन दोरगे, दादा माने, राहुल फडके,आशोक जाधव, गणेश टेमगीरे निरंजन ढमाले अमित पवार,तुषार पवार,सुरज चोरगे, चिंतामणी मदने, विकास बधे अनिकेत चोभे,केतन चोभे,पोपट दोरगे, सोमनाथ दोरगे, दत्ता धुमाळ, दिपक तांबे ओमकार चोभे, युवा तरुण कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात प्रामुख्याने उपस्थित आहेत.

तसेच या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे, बैलांचा रॅम्प शो” चे दिनांक – १७/११/२०२२ रोजी आयोजन केले आहे. या स्पर्धेत सहभागी स्पर्धकास सर्टिफिकेट व प्रथम तीन विजेत्यांना दौंडचा_राजा” या नावाने चषक देण्यात येईल. तसेच विविध विषयांवरील दालने व १५० हून अधिक उद्योगांनी व शेतकऱ्यांनी या प्रदर्शनात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे,

Previous articleसख्या आईचा मुलाने डोक्यात खोरे घालून केला खून ; जुन्नर तालुक्यातील शिरोली तर्फे आळे येथील घटना
Next articleमहाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांच्या नियोजन विभागाच्या अधिकार्‍यांचा टेकवडी गावाला अभ्यास दौरा