पिडीतेसह,आरोपी व संशयित आरोपीची डिएनए चाचणी होणार

राजगुरुनगर-खेड तालुक्यातील कनेरसर येथील मतिमंद मुलीवरील बलात्कार प्रकरणाबाबत पिडीत महिला,आरोपी व संशयित आरोपी या तिघांची डिएनए चाचणी करण्याची सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी लेखी निवेदनाद्वारे केलेली मागणी खेड पोलीस स्टेशनने मान्य केली असून तसे लेखी पत्र दिले आहे.मुख्य मागणी मान्य केल्याने व या गुन्ह्यात डिएनए चाचणीतूनच आरोपी कोण हे स्पष्ट होणार असल्याने जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे २१ ऑगस्टपासून करण्यात येणारे धरणे आंदोलन टाव्हरे यांनी स्थगित केले आहे.

खेड पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपीबरोबर इतर व्यक्तीवर गावात संशय व्यक्त केला जात होता .गुन्हा दाखल होण्या अगोदर एक ऑडियो क्लीप व्हायरल झाली होती.त्यामुळे अशोकराव टाव्हरे यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस अधिक्षक यांना निवेदने पाठवून कारवाईची मागणी केली होती.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बलात्काराचे गुन्हे सरसकट दाखल न करता शहानिशा ,समांतर तपासणी करावी अशी मार्गदर्शक तत्वे आहेत.

कनेरसर येथील पिडीत मुलगी ही साडे सहा महिन्याची गर्भवती होती.ही बाब आई वडिलांना घरीच समजली असताना तातडीने खेड पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली नाही. काही दिवसांनी पिडीत मुलीला मोशी येथील संस्थेत दाखल केले व नंतर संस्थेचे पत्र व मुलीने घेतलेले नाव यावरून महेश पोपट दौंडकर या व्यक्तींविरूद गुन्हा दाखल केला आहे,परंतु सदर आरोपी अटक नाही. काही व्हायरल ऑडियो क्लीप व इतर वस्तुस्थिती पाहून अशोकराव टाव्हरे यांनी उच्चस्तरीय पाठपुरावा केला व शेवटी खेड पोलीस स्टेशनने टाव्हरे यांची डिएनए चाचणीची मागणी मान्य केली आहे.

गावातील चर्चा, ऑडियो क्लीप व आई वडिलांनी मुलगी गर्भवती असल्याचे लक्षात आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यास केलेली दिरंगाई पाहून संदिग्धता वाटल्याने मी डिएनए व सखोल चौकशीची मागणी केली. आरोपी कोणीही असु द्या मुलगी मतिमंद असल्याने मागणी न्याय्य होती.
~अशोकराव टाव्हरे, सामाजिक कार्यकर्ता.

Previous articleसामाजिक दुरदृष्टीतुन शिंदवणे गावाचा सर्वागीण विकास – ऋषीकेश पवार
Next articleकोरोना प्रादुर्भावात ही महावितरणचे कर्मचारी देतात अविरत सेवा