कोरोना प्रादुर्भावात ही महावितरणचे कर्मचारी देतात अविरत सेवा

दिनेश पवार-दौंड(प्रतिनिधी)

कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या सर्वत्र दिसून येत आहे, या परिस्थितीत सर्व क्षेत्राला अजून तरी पूर्ण सुरुवात झाली नाही,त्यामुळे वर्क फ्रॉम होम सध्या सुरू आहे, आशा परिस्थितीत महत्वाची गरज म्हणजे विज थोड्यावेळ जरी गेली तर असह्य होते, अशातच पावसाळा सुरू आहे , ग्रामीण भागात यावर्षी समाधानकारक पाऊस पडत आहे त्यामुळे परिसरात विजतार तुटणे,खांब कलणे,ढील पडणे,झाड पडणे यासारख्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत, आशा परिस्थितीत महावितरण दौंड ग्रामीण भागात येणाऱ्या देऊळगाव राजे उपकेंद्र येथील कर्मचारी सतर्कता दर्शवत हे काम लगेचच पूर्ववत करत आहेत.ग्राहकांच्या सेवेसाठी watsup ग्रुप तयार करण्यात आला आहे, या ग्रुपवरती सर्व माहिती पाठवली जाते त्यामुळे नागरिकांना सर्व माहिती याग्रुपवर उपलब्ध होत आहे, तसेच नागरिक देखील आपल्या आसपास घडणाऱ्या घटना ग्रुपमार्फत पोहचवत आहे त्यामुळे दुरुस्ती करण्यास वेळ जात नाही.

महावितरण चे सहाय्यक अभियंता ठोंबरे साहेब,धोत्रे साहेब,लाईन मेन- ज्ञानदेव रसाळ मामा,नितीन मेंगावडे,दादासाहेब मेंगावडे,सौरभ देशमाने, राहुल गायकवाड,गणेश जगताप हे सर्वजण नागरिकांना तत्काळ सेवा देण्यासाठी कोरोना प्रादुर्भावात, भर पावसात सज्ज आहेत,खरं तर हेच खरे योद्धे आहे ,यासर्व कर्मचाऱ्यांच्या कामावरती परिसरातील नागरिक समाधानी आहे.दरम्यान गणेशोत्सव काळात नागरिकांनी विजेचा वापर जपून करावा,अनधिकृत मार्गाने वीज वापरू नये तसेच योग्य खबरदारी घेऊन,चांगली दर्जेदार वीज उपकरणे वापरावीत व आपला उत्सव निर्विघ्न पणे पार पाडावा.

Previous articleपिडीतेसह,आरोपी व संशयित आरोपीची डिएनए चाचणी होणार
Next articleश्रीकृष्ण मंदिर महानुभाव शिक्रापूर प्रवेशद्वाराचे उदघाटन तसेच सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामीचा अवतार दिन अष्टशताब्दि वर्षानिमित्त सोहळा साजरा