सामाजिक दुरदृष्टीतुन शिंदवणे गावाचा सर्वागीण विकास – ऋषीकेश पवार

अमोल भोसले, उरुळी कांचन – प्रतिनिधी

महालक्ष्मी उद्योग समुहाचे अध्यक्ष आण्णासाहेब महाडिक यांच्या सामाजिक दुरदृष्टीतुन शिंदवणे गावाचा सर्वागीण विकास झाला आहे नागरिकांनी विकासाच्या पाठिशी ठामपणे उभे राहवे. शिंदवणे गावाच्या विकासकामे करताना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे – शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे तसेच शिरुर – हवेली विधानसभेचे आमदार अशोक पवार व पुणे जिल्हा परिषद – हवेली तालुका पंचायत समिती यांचे विशेष सहकार्य लाभले असे मत युवा नेते ऋषीकेश अशोक पवार यांनी व्यक्त केले.

ग्रामपंचायत शिंदवणे (ता.हवेली) येथील विविध विकास कामाचा उदघाटन सोहळा नुकताच सोशल डिस्टनशिंग ठेवून संपन्न झाला.
शिंदवणे ग्रामपंचायत प्रशासकीय इमारत सभागृह, बागेत वॉकिंग प्लाझा, बागेस संरक्षण भिंत , दशक्रिया विधी घाट, श्री संत यादवबाबा सांस्कृतिक भवन या विकास कामांचे उदघाटन समारंभ प्रसंगी ऋषीकेश अशोक पवार बोलत होते.

या उदघाटन प्रसंगी हवेली तालुका हवेली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, आमदार अशोक पवार यांचे चिरंजीव ऋषिकेश पवार, पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या किर्ती अमित कांचन, हवेली तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती तथा हवेली तालुका पंचायत समितीच्या सदस्या वैशाली गणेश महाडीक, हवेली तालुका पंचायत समितीच्या सदस्या हेमलता बडेकर, शिंदवणेचे सरपंच आण्णासाहेब भाऊसाहेब महाडीक, उपसरपंच पल्लवी महाडीक, माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य गणेश महाडिक सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, कर्मचारी वृंद, व ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleजुन्नर तालुक्यात आज अखेर 698 पॉझिटिव्ह रुग्ण
Next articleपिडीतेसह,आरोपी व संशयित आरोपीची डिएनए चाचणी होणार