रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्याध्यक्षपदी गणेश साळवे यांची निवड

कुरकुंभ , सुरेश बागल

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या बिनविरोध तालुका अध्यक्ष पदी रवींद्र कांबळे तर कार्यध्यक्ष पदी गणेश साळवे यांची निवड करण्यात आली.

दि . २७ रोजी १०:००वा रॅली हुतात्मा चौकातून निघाली व संविधान चौकामध्ये रॅलीचा शेवट करण्यात आला. सहकार चौकातील हॉटेल सिटी इन येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळेस
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष मजबूत केल्यामुळे रवींद्र कांबळे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच इतर बाकी कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली आहे गणेश साळवे यांचे सामाजिक काम चांगले असल्यामुळे त्यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात यावी असे कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे. गणेश साळवे यांची निवड झाल्यानंतर त्यांनी पक्ष बळकट करण्यासाठी आणि सामाजिक काम करण्यासाठी मी सदैव प्रयत्न करत राहील असे कार्याध्यक्ष गणेश साळवे यांनी सांगितले.

सामाजिक कार्यकर्ते गणेश साळवे हे मुख्य रहिवासी रावणगाव येथील असून समाजात राहून समाजासाठी धडपड सतत चालू असते त्यासाठी त्यांना हे कार्याध्यक्ष पद देण्यात आले आहे

या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून पश्चिम महा.राज्याचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, तसेच महा.राज्याचे संघटक सचिव परशुराम वाडेकर ,महा.राज्य महिला अध्यक्ष चंद्रकांता सोनकांबळे ,खाजभाई शेख, अल्पसंख्याक सरचिटणीस महाराष्ट्र राज्य  पुणे

विकास कदम,  मा .पुणे जिल्हा युवक अध्यक्ष प.महा जिल्हा सरचिटणीस गणेशजी गायकवाड,  उमेश कांबळे हे उपस्थित होते .पक्ष निरीक्षक म्हणून विक्रम शेलार काम पाहत होते तसेच रवींद्र कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दौंड तालुक्यातील व शहरातील सतीश भाऊ थोरात रोहित कांबळे प्रकाश थोरात  सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleभीमाशंकर आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयातराष्ट्र नेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्या निमित्त जनजागृती
Next articleनाभीक महामंडळाकडुन राहुल दिवेकर यांचा गुणगौरव व सत्कार