भीमाशंकर आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयातराष्ट्र नेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्या निमित्त जनजागृती

भीमाशंकर आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा भारतीय जनता पक्ष व युवा मोर्चा आंबेगाव,अटल बिहारी वाजपेयी विचार मंच यांच्यावतीने विद्यार्थी यांना महिला संरक्षण कायदे व निर्भया पथक जनजागृती बाबत व्याख्यान आयोजित केले होते. यास प्रमुख्य व्यख्याते म्हणून मंचर पोलीस स्टेशनचे महिला पोलीस उपनिरीक्षक रूपाली पवार मॅडम व मयुरी तुरे मॅडम उपस्थित होते.

यावेळी पी एस आय पवार मॅडम यांनी सायबर गुन्हे,आर्थिक फसवणूक गुन्हे माहिती महिलांसाठी असणारे कायदे गुन्हे तपास करताना येणारे अनुभव महाविद्यालतील विद्यार्थी यांस पोलीस प्रशासन यांचे महिलांसाठी राबविणारे नवनवीन उपक्रम बाबत माहिती दिली.

पीएसआय मयुरी तुरे मॅडम यांनी महिलांसाठी असणारे कायदे भारतीय दंड संहिता व शिक्षा निर्भया पथक यांची कामे व महिला सक्षमीकरण बाबत माहिती दिली.विद्यार्थी यांनी पी एस आय पवार मॅडम व तुरे यांचे बरोबर विविध प्रश्न व उत्तरे असा मनमोकळा संवाद साधला.

या वेळी डॉ ताराचंद कराळे यांनी जीवनामध्ये डॉक्टर म्हणून सामाजिक कार्य करणे बाबत विद्यार्थी यांस सांगितले. प्रमुख उपस्थिती भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष मा.डॉ.ताराचंद कराळे, संघटन सरचिटणीस संदीपभाऊ बाणखेले, प्राचार्य डॉ. प्रशांत अजनाळकर, डॉ विक्रांत पवार,मंचर अध्यक्ष गणेश बाणखेले, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष मेघशाम भोर, महेश पिंगळे ,डॉ निचित आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ अनुजा कुलकर्णी आभार आरोग्यदूत जिल्हा युवा उपाध्यक्ष सुशांत थोरात व यांनी मानले.

Previous articleमाजी विद्यार्थी या नात्याने प्रत्येक विद्यार्थी यांनी आपण घेतलेल्या शिक्षण संस्थेस मदत करावी–सुदर्शन चौधरी
Next articleरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्याध्यक्षपदी गणेश साळवे यांची निवड