सावरदरीत साध्या पद्धतीने बैल पोळा सण साजरा

चाकण – सावरदरी (ता.खेड) येथे भाद्रपद बैल पोळा सण साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. गावातील प्रशासनाने लम्पी स्किन या रोगामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांच्या सुरक्षिततेसाठी बैल पोळा सण हा साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले होते. नागरिकांनीही प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत सण साध्या पद्धतीने साजरा केला.

सध्या देशभरात लम्पी स्किन या रोगामुळे हजारो पशुंचा मृत्यू झालेला आहे. सावरदरी ग्रामपंचायत व वैद्यकीय अधिकारी यांच्या माध्यमातून गावामध्ये जनावरांना १००% लसीकरण देखील झाले होते. तरी देखील सुरक्षेच्या कारणास्तव बैलपोळा साध्या पद्धतीने कसल्याही प्रकारचे मिरवणूक व गावात मंदिरा वर कोणीही बैल घेऊन येऊ नये असे आवाहन केले होते. नागरिकांनीही काटेकोलपणे पालन करत या आजारातून लवकरात लवकर बाहेर पडू अशी प्रार्थना सर्व शेतकरी व बैलगाडा मालक यांनी ग्रामदैवत गोंधळजाई देवीचरणी केली. आपल्या दारापुढे व गोठ्यामध्ये प्रत्येकाने हिंदू संस्कृती प्रमाणे आपल्या बैलांची पूजा केली.

लम्पी स्किन या रोगामुळे आजवर अनेक जनावरे मरण पावली आहे. यामुळे गावातील जनावरांच्या सुरक्षिततेसाठी आज साजरा होणारा सण साध्या पद्धतीने साजरा करून प्रशासनाला सहकार्य केल्याबद्दल सबंध नागरिकांचे आभार.
-: संदिप बाळासाहेब पवार (मा उपसरपंच सावरदरीगाव)

Previous articleनागेश्वरी केदार यांना “शूर तेजस्विनी ” पुरस्कार २०२२ प्रदान
Next articleसर्पमित्र ऋग्वेद रोकडे यांचा “द रियल हिरो अवॉर्ड २०२२” पुरस्काराने सन्मान