सर्पमित्र ऋग्वेद रोकडे यांचा “द रियल हिरो अवॉर्ड २०२२” पुरस्काराने सन्मान

योगेश राऊत ,पाटस

हिंगोली येथील डॉ.संजय नाकाडे व जगविख्यात सर्पतज्ञ नीलिमकुमार खैरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ पहेणी, जिल्हा हिंगोली यांच्या वतीने २३ सप्टेंबर २०२२ रोजी हिंगोली येथील महावीर भवन ,रामलीला मैदान,देशमुख सभागृह या ठिकाणी ” द रियल हिरो अवॉर्ड २०२२” पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

सर्प संरक्षण व प्राणी रक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल दौंड तालुक्यातील पाटस येथील सर्पमित्र व प्राणीमित्र श्री.ऋग्वेद रोकडे यांची निवड करून “द रियल हिरो अवॉर्ड २०२२” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

दौंड तालुक्यामध्ये नेहमी वन्यजीवांच्या मदतीला धावून जाऊन वन्यजीवांचे प्राण वाचवणे तसेच सर्प संरक्षणाचे कार्य निस्वार्थीपणे करणे या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जगविख्यात सर्पतज्ञ नीलिमकुमार खैरे,देवदत्त शेळके मास्तर व डॉक्टर संजय नाकाडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या पुरस्कार सोहळ्यासाठी सर्प अभ्यासक सागर बावळे सर तसेच या कार्यक्रमाचे आयोजक विजयराज पाटील व काही सर्पमित्र उपस्थित होते.

Previous articleसावरदरीत साध्या पद्धतीने बैल पोळा सण साजरा
Next articleसर्पमित्र ऋग्वेद रोकडे यांचा “द रियल हिरो अवॉर्ड २०२२” पुरस्काराने सन्मान