नागेश्वरी केदार यांना “शूर तेजस्विनी ” पुरस्कार २०२२ प्रदान

नारायणगाव : (किरण वाजगे)

विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ पहेणी द्वारा आयोजित तसेच प्राणी मित्र व वन्यजीव मित्र विजयराज पाटील मित्र मंडळ व महाराष्ट्रातील प्राणी मित्र तसेच सर्पमित्र संघटनेच्या वतीने वन्यजीव क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना डॉ. संजय नाकाडे व निलीमकुमार खैरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हिंगोली येथे नुकतेच गौरविण्यात आले.

वन्यजीव क्षेत्रात उल्लेखनीय व संस्मरणीय कामगिरी करणाऱ्या सन २०२२ सालचा शूर तेजस्विनी पुरस्कार गेली अनेक वर्षांपासून सर्पमित्र म्हणून कार्यरत असणाऱ्या व वेगवेगळ्या जातींच्या सापांना जीवदान देणाऱ्या सर्प मैत्रिण ‘नागेश्वरी केदार’ यांना देण्यात आला.

नागेश्वरी हिने अनेक विषारी इंडियन कोब्रा, फुरसे, पटेरी मण्यार, याशिवाय बिनविषारी साप मांडूळ, धामण, आदी प्रकारच्या सापांना पकडून तसेच जखमी सापांवर उपचार करून निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिल्याबद्दल नागेश्वरी केदार हिला हा पुरस्कार देण्यात आला.

याशिवाय वन्यजीव क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारे जुन्नर तालुक्यातील दीपक माळी व वैभव गावडे यांना देखील ‘द रियल हिरो’ २०२२ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. जुन्नर तालुक्यातील या तीनही धाडसी व शूर युवकांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे परिसरात कौतुक होत आहे.

Previous articleसिताबाई थिटे फार्मसी महाविद्यालयात जागतिक औषध निर्माता दिन साजरा
Next articleसावरदरीत साध्या पद्धतीने बैल पोळा सण साजरा