खेड डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली

चाकण – खेड डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा (दि.२३) सप्टेंबर रोजी सकाळी ११:०० वा. पुणे राजयोग बेनक्वीट हाॅल वाकडेवाडी येथे सर्व शेअर्स धारकांच्या उपस्थितीत पार पडली.

या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सभेपुढील सर्व विषय शेअर्स धारकांच्या बहुमताने मंजूर करण्यात आले.तसेच विशेष अतिथी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. खासदार राजू शेट्टी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ८५% शेअर्स धारकांनी शेअर्स विक्री चांगल्या दराने करण्यासाठी ऐनवेळी येणाऱा विषय म्हणून बहुमताने ठराव मंजूर करण्यात आला.

तसेच शेअर्सची व्हॅल्यू २.२८ इतकी झालेली आहे तसेच यापुढील सर्व अधिकार शेतकऱ्यांच्या अधिकॄत कमेटीला दिलेले आहेत,तरी उर्वरित शेअर्स धारकांनी डिमॅट अकाउंट लवकरात लवकर खेड येथील KDL कंपनीच्या ऑफिस मध्ये येऊन उघडून घ्यावीत असे सांगितले.

या वार्षिक सर्वसाधारण सभेला मा.खासदार राजू शेट्टी साहेब, सेक्रेटरी श्री महेश मोरमपल्ले,KDL संचालक श्री चंद्रकांत भालेकर, श्री संतोष शिंदे व बहुसंख्येने कनेरसर, केंदूर, निमगाव,दावडी,रेटवडी,गोसासी येथील शेअर्स धारक शेतकरी उपस्थित होते

Previous article गार (बेटवाडीच्या) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राणी भुजबळ यांची बिनविरोध निवड
Next articleअक्षय बोराडेने यापुढे शिवजन्मभूमीचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिले जाईल- रूपेश जगताप