गार (बेटवाडीच्या) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राणी भुजबळ यांची बिनविरोध निवड

 यगेश राऊत पाटस

दौंड तालुक्यातील गार (बेटवाडी) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आमदार राहुल कुल व पंढरीनाथ पासलकर गटाच्या राणी सचीन भुजबळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.ठरलेल्या मुदतीप्रमाणे डॉ सुलभा संदिप गावडे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने सरपंच पदाची जागा रिक्त झाली होती.या रिक्त जागेवर राणी सचीन भुजबळ यांचा एकमेव नामनिर्देशन भरल्यामुळे निवडणुक निर्णय अधिकारी यांनी राणी भुजबळ यांची सरपंचपदी बिनविरोध निवड केली श.यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी सुनिल जाधव ग्रामसेवक भिमराव खोमने , तलाठी बापु देवकाते यांनी काम पाहील.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य राम सुर्वे, नथू पासलकर, संभाजी होले, संतोष शितकल ,फिरोज सय्यद,डॉ सुलभा गावडे,लता नांदखिले,वैशाली येडे,स्नेहल निवंगुणे, बाळासाहेब नांदखीले, बाळासाहेब भोसले,डॉ संदिप गावडे,अरुण सुर्वे,कालीदास घाडगे, संदिप कांबळे,नारायण गाडवे,संपत होले,ज्ञानेश्वर निवंगुणे, प्रकाश होले,धनंजय वायसे,नवनाथ पासलकर,शरद भुजबळ,गणेश गावडे,गणेश दोरड यांच्यासह आजी, माजी पदाधिकारी उपस्थित होते

Previous articleपद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालया मार्फत उरुळी कांचन मध्ये लम्पी आजारा विषयी जनजागृती
Next articleखेड डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली