शासनाने तातडीने पिकांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी

उरुळी कांचन

पूर्व हवेली तालुक्यातील परिसरात टिळेकरवाडी येथील निवृत्ती बाबुराव टिळेकर यांच्या शेतातील डाळिंब बागेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तसेच या परिसरात असणाऱ्या अन्य शेतकऱ्यांच्या बागांना जोरदार पाऊसाचा तडाखा बसला.

उरुळी कांचन, वाडेबोल्हाई, अष्टापूर, भवरापूर, कोरेगावमुळ, पेठ, नायगाव, बिवरी, शिंदेवाडी, शिरसवडी, तरडे, सोरतापवाडी, शिंदवणे, वळती, न्हावी सांडस, सांगवी सांडस, पिंपरी सांडस, या भागात ही असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिकांची यामध्ये पालेभाज्या कोथिंबीर, मेथी, पालक, शापु, टोमॅटो, कांद्याची रोपे, मका, बाजरी पिकांना धोका निर्माण झाला आहे. सलग पावसामुळे खरीप हंगामातील पिके पाण्याखाली गेली. सलग पावसामुळे सर्व ओढे नाले फुल्ल भरुन वाहत आहे. शासनाने तातडीने पिकांची पाहणी करुन पंचनामे करुन नुकसान भरपाई तातडीने उपलब्ध करुन देण्याची मागणी टिळेकरवाडी (ता.हवेली) ग्रामपंचायत सदस्य तथा शेतकरी गणेश टिळेकर यांनी व्यक्त केली.

परतीच्या पावसाने पिकांचे मुळंच सडल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांंच्या हातातोंडाशी आलेला घास अस्माने संकटाने अक्षरशः ओढून नेल्याचे चित्र आहे. शेतमालाला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. संबंधित कृषी विभागाने तातडीने पंचनामे करुन सर्व सामान्य शेतकऱ्यांना नुकसान भरपाई च्या माध्यमातून. दिलासा द्या अशी मागणी बिवरी गावचे माजी उपसरपंच तथा शेतकरी सुनिल गोते यांनी केली आहे.

Previous articleगणेशोत्सवानिमित्त नारायणगाव परिसरात सार्वजनिक मंडळाचे आकर्षक देखावे
Next articleडॉ मणिभाई देसाई पतसंस्था सभासदांना १५ टक्के लाभांश देणार- राजेंद्र कांचन