गणेशोत्सवानिमित्त नारायणगाव परिसरात सार्वजनिक मंडळाचे आकर्षक देखावे

किरण वाजगे

नारायणगाव परिसरामध्ये गणेश उत्सवानिमित्त स्थानिक गणेश मंडळांनी विविध विषयांवर देखावे सादर केले आहेत. परंतु गेली चार दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे गणेश मंडळांचा देखावा पाहण्यासाठी व सजावटीसाठी केलेला खर्च वाया गेला आहे. यामुळे एक प्रकारे गणेश भक्तांमध्ये विघ्न निर्माण झाले आहे.

नारायणगाव येथील प्रमुख मंडळांपैकी श्री गणेश गणेशोत्सव मंडळ वाजगेआळी, विरोबा मित्र मंडळ पाटेआळी, हनुमान चौक, श्रीराम चौक, काशीविश्वेश्वर मंडळ, श्री मुक्ताबाई मंडळ मावळे आळी व भाजी बाजार, महासुर्योदय मित्र मंडळ, शिव विहार गणेश मंडळ, तसेच खैरे मळ्यांमधील शिव झुंजार मित्र मंडळ, नवनाथ मित्र मंडळ, संत सावता महाराज मित्र मंडळ कोल्हे मळा, विटे को-हाळे मळा, श्री गणेश मंडळ शेटे मळा,औदुंबर मंडळ, नारायणवाडी मंडळ, वारूळवाडी येथील भागेश्वर मंडळ, शिवनेरी मित्र मंडळ साने वस्ती, नवशक्ती मंडळ, प्रगती मंडळ, चिमणवाडी गणेश मंडळ तसेच विविध मार्केट, सोसायट्यांमधील मंडळांच्या बाप्पांचे आकर्षक गणेश मूर्ती व देखावे पाहायला पावसामुळे व्यत्यय येत आहे.

दरम्यान नेहमी वेगळा व सुंदर देखावा करणारे नारायणगाव येथील शशी नेवकर यांनी आपल्या घरात नारायणगावचे ऐतिहासिक श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार साकारले आहे.

तसेच निखिल घाडगे यांनी नारायणगावची श्री मुक्ताबाई देवीची यात्रा कुबेहूब साकारली आहे. श्री गणेशोत्सव मंडळ वाजगे आळी यांनी हृदयस्पर्शी देखावा सादर केला आहे, श्रीराम मंडळांने जय जवान जय किसान हा देखावा सादर केला आहे. विरोबा मित्र मंडळ पाटेआळी यांनी स्वच्छ मीनाई नदीचा देखावा सादर केला आहे. आदर्श मित्र मंडळाने मोबाईलच्या दुनियेत संस्कृतीचा ऱ्हास हा देखावा सादर केला आहे.

Previous articleकनेरसर येथील जि.प.प्राथमिक शाळेत शिक्षक दिन साजरा
Next articleशासनाने तातडीने पिकांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी