कनेरसर येथील जि.प.प्राथमिक शाळेत शिक्षक दिन साजरा

राजगुरूनगर

भारताचे माजी राष्ट्रपती डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांची जयंती व शिक्षक दिन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कनेरसर येथे साजरा करण्यात आला.

या वेळी कनेरसर केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय श्री.बाळासाहेब गावडे साहेब, कनेरसर शाळेचे मुख्याध्यापक श्री.नानाभाऊ गावडे, शाळेतील शिक्षिका श्रीम. अंजली शितोळे,श्रीम. सारिका राक्षे, श्रीम.शुभांगी जाधव मॅडम, कनेरसरचे सामाजिक कार्यकर्ते,शिक्षणप्रेमी पालक, श्री,.चंद्रकांत भाऊ दौंडकर, कनेरसरचे ग्रामस्थ शिक्षक श्री. संदिप म्हसुडगे उपस्थित होते.
प्रथम डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका श्रीम. सारिका राक्षे मॅडम यांनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन व शिक्षक दिन या विषयी माहिती सांगितली.

शिक्षक हे समाजविकासाचे केंद्रबिंदू आहे. समाज परिवर्तनाबरोबरच भविष्यातील विचारवंत, डाॅक्टर, प्राध्यापक, इंजिनीअर, शास्त्रज्ञ तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असते. मातीच्या गोळयाला योग्य आकार देवून कुंभार सुंदर कलाकृती तयार करतो. अगदी त्याप्रमाणेच शिक्षक बालकांच्या कोवळया मनावर योग्य संस्कार करून त्यातून भविष्यातील जबाबदार नागरीक घडवण्याचे काम शिक्षक करतात. असे श्री. चंद्रकांत भाऊ दौंडकर यांनी सांगितले.

आपल्या कनेरसर जि.प.प्राथमिक शाळेत असणारे सर्व शिक्षक उपक्रमशील असून अनेक उपक्रम राबवित आहेत. व शाळेची गुणवत्ता वाढीसाठी उत्तम प्रकारचे काम करत आहेत.सर्व शिक्षकांना प्रेरणा देण्यासाठी व त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी शाळेतील शिक्षकांचा सन्मान .श्री. चंद्रकांत भाऊ दौंडकर व शिक्षक ग्रामस्थ श्री. संदिप म्हसुडगे यांच्या वतीने करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे मुख्याध्यापक श्री.नानाभाऊ गावडे सर यांनी आभार मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Previous articleउमाजी राजांचा इतिहास सर्वसामांन्य पर्यत गेला पाहिजे- संपतराव गारगोटे
Next articleगणेशोत्सवानिमित्त नारायणगाव परिसरात सार्वजनिक मंडळाचे आकर्षक देखावे