डॉ मणिभाई देसाई पतसंस्था सभासदांना १५ टक्के लाभांश देणार- राजेंद्र कांचन

उरुळी कांचन

डॉ मणिभाई देसाई सहकारी पतसंस्थेची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या मुख्यकार्यालयात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कांचन होते. यावेळी बहुसंख्येने सर्व शाखेचे सभासद उपस्थित होते.

संस्थेच्या ३१ मार्च २०२२ अखेर ठेवी २२५ कोटी ४४ लाख, कर्ज १६५ कोटी ९० लाख व गुंतवणूक ८८ कोटी १३ लाख रुपये आहे. संस्थेस ४ कोटी ९० लाख ढोबळ नफा व तरतुदी केल्यानंतर २ कोटी ९७ लाख निव्वळ नफा झाला आहे. पतसंस्थेतर्फे सभासदांना १५ टक्के लाभांश देणार असल्याची माहिती डॉ मणिभाई देसाई पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कांचन यांनी जाहीर केले.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेच्या वतीने १०० महिन्यात मणिअमृतमहोत्सव दामदुप्पट ठेव योजना सुरु करणार असल्याचे अध्यक्ष राजेंद्र कांचन यांनी सभासदांना मार्गदर्शन करताना सांगितले. संस्थेचे सभासद असलेले उरुळी कांचन सरपंचपदी निवड झाल्याबद्दल राजेंद्र बबन कांचन, खामगाव टेकच्या उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल मारुती किसन थोरात यांचा सत्कार करण्यात आला. नियमित कर्ज भरणाऱ्या कर्जदारांना यावेळी सन्मानित करण्यात आले.

संस्थेच्या वार्षिक सभेचे कामकाज खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले. संस्थेचे प्रेरणास्थान डॉ मणिभाई देसाई यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन माऊली कांचन, कोंडीराम चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सभासदांनी आपल्या सुचना मांडल्या त्यामध्ये केडगाव शाखेचे सल्लागार शिवाजी सोनवणे, व्यापारी असोसिएशनचे शहर अध्यक्ष संतोष कांचन, माजी सरपंच संतोष कांचन, रंगनाथ कड, लक्ष्मण म्हस्के, शांताराम चौधरी, अशोक टिळेकर, सुरेश सातव, बाळासाहेब चौधरी, इ. समावेश होता. सदर सभेस संचालक शरद वनारसे, सुभाष धुकटे, भाऊसाहेब कांचन, कांतीलाल चौधरी, संजय कांचन, खेमचंद पुरुसवाणी, चंद्रकांत लोणारी, बाळासाहेब कांचन, जनार्दन गोते, सारिका काळभोर, माया शितोळे, प्रकाश जगताप इ.उपस्थित होते. उपस्थित सभासदांचे आभार संस्थेचे उपाध्यक्ष रामदास चौधरी यांनी मांडले. अहवाल वाचन संस्थेचे मुख्यव्यवस्थापक लक्ष्मण वाल्हेकर यांनी केले.

Previous articleशासनाने तातडीने पिकांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी
Next articleजनार्दन दांडगे यांची भाजपाच्या पुणे जिल्हा सोशल मीडिया अध्यक्षपदी नियुक्ती