जनार्दन दांडगे यांची भाजपाच्या पुणे जिल्हा सोशल मीडिया अध्यक्षपदी नियुक्ती

उरुळी कांचन

लोणी काळभोर (ता.हवेली) येथील जनार्दन दांडगे यांची भारतीय जनता पार्टीच्या पुणे जिल्हा सोशल मीडिया अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. नुतन प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

याप्रसंगी आमदार राहुल कुल, आमदार भिमराव तापकीर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री विजय शिवतारे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रदिप कंद, जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, प्रदेश कार्यकारणी सदस्य रोहिदास उंद्रे, तालुका अध्यक्ष संदीप भोंडवे, धर्मेंद्र खांडरे, प्रविण काळभोर, राहुल शेवाळे, दादासाहेब सातव, विकास जगताप, अजिंक्य कांचन, श्रीकांत कांचन, कमलेश काळभोर, पत्रकार सुनिल जगताप, जयदीप जाधव आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पक्षाने दिलेल्या संधीचे संघटनेच्या माध्यमातून संघटन कशाप्रकारे वाढेल या दुष्टीने प्रयत्न करणार असल्याचे मत नुतन सोशल मीडिया पुणे जिल्हा अध्यक्ष जनार्दन दांडगे यांनी सांगितले.

Previous articleडॉ मणिभाई देसाई पतसंस्था सभासदांना १५ टक्के लाभांश देणार- राजेंद्र कांचन
Next articleउंडवडीत आमदार राहुल कुल यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन