उंडवडीत आमदार राहुल कुल यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन

उरुळी कांचन

आमदार राहुल कुल यांच्या शुभहस्ते उंडवडी ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन समारंभ संपन्न झाला. उंडवडी गावठाण येथे नळ पाणीपुरवठा योजना, उंडवडी सौंदडवाडी बंदिस्त गटर लाईन भूमीपूजन व ग्रामपंचायत उंडवडी बहुउद्देशीय सभागृह, जि.प. प्राथमिक शाळा भोसलेवाडी इमारत व सांस्कृतिक स्टेज, जि. प. प्राथमिक शाळा उंडवडी इमारत व सांस्कृतिक स्टेज , उंडवडी गावठाण जलशुद्धीकरण खोली जिल्हा भोसलेवाडी स्मशानभूमी सुशोभीकरण, पोलीस पाटील कार्यालय या कामांचा लोकार्पण सोहळा आमदार राहुल कुल यांच्या शुभहस्ते पार पडला.

याप्रसंगी उपस्थित महालक्ष्मी उद्योग समूह विशाल भोसले, उद्योजक शामराव दोरगे, भीमा सहकारी साखर कारखाना संचालक माणिक कांबळे, सरपंच दिलीप देशमुख , उपसरपंच सुभाष यादव, उपसरपंच रवींद्र होले, भाजपचे जेष्ठ नेते तानाजी दिवेकर, मा सरपंच पांडुरंग आखाडे, ग्रा.प. सदस्य दत्तात्रय आखाडे, संभाजी नातू , उंडवडी ग्रामपंचायत विद्यमान सरपंच दीपमलाताई सतीश जाधव, विद्यमान उपसरपंच विकास सुभाष कांबळे, ग्रामपंचायत सदस्या मैनाताई गुंड, श्रीमती विमल जाधव, सदस्या सुनील नवले सदस्य, पोलीस पाटील राजेंद्र जगताप, मा. तंटामुक्ती अध्यक्ष सचिन गुंड, मा. सरपंच विकास सोनवणे, मा. उपसरपंच लक्ष्मण भंडलकर, मा. सरपंच मुरलीधर भोसले, पाणीपुरवठा अध्यक्ष संपत टिळेकर, रवी पांढरे, भिकू कांबळे आणि सर्व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यमान तंटामुक्ती अध्यक्ष दिनेश गडदे यांनी केले व आभार उपसरपंच विकास कांबळे यांनी केले.

Previous articleजनार्दन दांडगे यांची भाजपाच्या पुणे जिल्हा सोशल मीडिया अध्यक्षपदी नियुक्ती
Next articleनारायणगावात मध्यरात्री दीड वाजता सार्वजनिक गणेश मंडळाचे विसर्जन