पद्मश्री मणीभाई देसाई महाविद्यालयात डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती उत्साहात साजरी

उरुळी कांचन

महात्मा गांधी सर्वोदय संघ संचलीत, पद्मश्री मणीभाई देसाई महाविद्यालय उरुळी कांचन (ता.हवेली) येथे डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.समीर आबनावे होते.

अध्यक्षीय मनोगतून कला व मराठी विभाग प्रमुख डॉ.समीर आबनावे यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व पटवून दिले व विद्यार्थ्यांनी वाचनाची आवड जोपासून ग्रंथालयाचा अधिकाधिक वापर करुन आत्मनिर्भर व्हावे व नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे असे आवाहन केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ग्रंथालय विभागप्रमुख प्रा.सौरभ साबळे यांनी केले. त्यांनी डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या कार्याचा आढावा घेतला. आभारप्रदर्शन प्रा.शैलजा वाडेकर यांनी केले. यावेळी प्रा.अंजली शिंदे, प्रा. प्रदीप राजपूत, प्रा रोहित बारवकर, प्रा. तोरवे, प्रा.मोरेश्वर बगाडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनात प्रा. प्रदीप राजपूत व विशाल महाडिक या सर्व कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Previous articleपाटसमध्ये १००१ फूट लांबीच्या राष्ट्रीय ध्वजाची भव्य रॅली
Next articleराज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सोरतापवाडी ग्रामपंचायतचा आर आर पाटील स्मार्ट व्हिलेज पुरस्काराने गौरव