पाटसमध्ये १००१ फूट लांबीच्या राष्ट्रीय ध्वजाची भव्य रॅली

योगेश राऊत,पाटस
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पाटस (ता .दौंड) येथे एक हजार एक फूट राष्ट्रध्वजाची भव्य रॅली काढण्यात आली . माजी ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते तानाजी केकाण यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला .

यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते . भारत माता की जय , वंदे मातरम या जयघोषाने परिसर दुमदुमला होता . आमदार राहुल कुल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य तानाजी केकाण यांनी तब्बल १००१ फूट राष्ट्रध्वज स्वखर्चाने तयार करून या तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते .

रविवारी सकाळी ८ वाजता या रॅलीला सुरुवात झाली . राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर चौक ते ग्रामदैवत श्रीनागेश्वर मंदिरपर्यंत ही रॅली काढण्यात आली . गावातील चौकाचौकात या रॅलीचे ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले . या रॅलीने ग्रामदैवत श्रीनागेश्वर मंदिराला प्रदक्षिणा घालून श्रीनागेश्वर विद्यालयात या रॅलीचा समारोप करण्यात आला .

तसेच पाटस गटातील जिल्हा प्राथमिक शाळा व हायस्कूल या सर्व ठिकाणी राष्ट्रध्वजा फडकवणात आलाय
त्याचप्रमाणे शिंदे वस्ती अंगणवाडी पाटस मधील चिमुकल्या मुलांनी खूप चांगल्या प्रकारे राष्ट्रध्वजा बद्दल खूप छान प्रकारे माहिती दिली .

स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेतील मुलांना खाऊ वाटप व डब्बा पिशव्या ग्रामपंचायत सदस्य राजू शिंदे यांच्या स्वखर्चातून भेट देण्यात आल्या. यावेळी कार्यक्रमाला सरपंच अवंतिका शितोळे ग्रामपंचायत सदस्य पालक वर्ग सी डी पी ओ अक्षदा शिंदे मॅडम गटविकास अधिकारी रोकडे आणि शिक्षक वर्ग आशा सेविका यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पाडला.

Previous articleसंस्कार व शिस्त यामुळे विद्यार्थी सूक्ष्म होतो – महात्मा गांधी सर्वोदय संघाचे विश्वस्त-खजिनदार राजाराम कांचन यांचे प्रतिपादन
Next articleपद्मश्री मणीभाई देसाई महाविद्यालयात डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती उत्साहात साजरी