संस्कार व शिस्त यामुळे विद्यार्थी सूक्ष्म होतो – महात्मा गांधी सर्वोदय संघाचे विश्वस्त-खजिनदार राजाराम कांचन यांचे प्रतिपादन

उरुळी कांचन

अभ्यासात कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी योग्य त्या उपाययोजना सुचविणे, अभ्यासाशी पूरक असलेल्या अभ्यासक्रमाचे नियोजन करण्यास सहाय्य मिळविणे, सहशालेय उपक्रमांना मान्यता देणे. आपला मुलगा मुलगी शाळेत वेळेत जातो का अभ्यासाव्यतिरिक्त तो काय करतो सर्व लक्ष आपल्या मुलांच्यावर असणे पालकांचे कर्तव्य आहे. विद्यार्थी गैरहजर राहिल्यास अभ्यासाची लिंक तुटते म्हणून आपला पाल्य जास्तीत जास्त शाळेत पाठवा घरचे वातावरण प्रसन्न ठेवा. संस्कार व शिस्त यामुळे विद्यार्थी सूक्ष्म होतो तसेच विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र तपासले पाहिजे असे मत महात्मा गांधी सर्वोदय संघाचे विश्वस्त-खजिनदार राजाराम कांचन यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपदावरुन पालकांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.

महात्मा गांधी विद्यालय उरुळी कांचन (ता.हवेली) येथील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांची पालक सभा आयोजित करण्यात आली होती.

यावेळी प्राचार्य भारत भोसले, उपप्राचार्य किसन कोकाटे, इयत्ता ९ वी व १० वीच्या विभागप्रमुख सुशीला कुंजीर, चारुशीला हेडाऊ, किशोर येवलेकर, इयत्ता ९ वी चे सर्व वर्गशिक्षक व पालक उपस्थित होते.

Previous articleराष्ट्रवादी काँग्रेसच्या उरुळी कांचन शहर उपाध्यक्षपदी जयंत काकडे यांची निवड : जिल्हा अध्यक्ष प्रदिप गारटकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र
Next articleपाटसमध्ये १००१ फूट लांबीच्या राष्ट्रीय ध्वजाची भव्य रॅली