राष्ट्रवादी काँग्रेसच्या उरुळी कांचन शहर उपाध्यक्षपदी जयंत काकडे यांची निवड : जिल्हा अध्यक्ष प्रदिप गारटकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र

उरुळी कांचन

पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा अध्यक्ष प्रदिप गारटकर यांच्या हस्ते जयंत बाळकृष्ण काकडे यांची उरुळी कांचन (ता.हवेली) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर उपाध्यक्षपदाचे निवडीचे नियुक्ती पत्र देण्यात आले. उरुळी कांचन राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष रामदास तुपे यांनी निवड केली.

याप्रसंगी हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, हवेली तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष सागर कांचन, हवेली तालुका राष्ट्रवादी महिला कॉग्रेस अध्यक्षा सुरेखा भोरडे, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब कांचन, माजी उपसरपंच सागर कांचन, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस जेष्ठ नागरिक सेलचे उपाध्यक्ष बाळकृष्ण काकडे सर, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी तालुका अध्यक्ष सुभाष टिळेकर, पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेस उपाध्यक्ष स्वराज्य तुपे, युवा नेते सुभाष टिळेकर, हवेली तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस सरचिटणीस आदेश तुपे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Previous article७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त संत निरंकारी मिशनच्या वतीने भवरापूर येथे १५००० वृक्षांची लागवड
Next articleसंस्कार व शिस्त यामुळे विद्यार्थी सूक्ष्म होतो – महात्मा गांधी सर्वोदय संघाचे विश्वस्त-खजिनदार राजाराम कांचन यांचे प्रतिपादन