राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सोरतापवाडी ग्रामपंचायतचा आर आर पाटील स्मार्ट व्हिलेज पुरस्काराने गौरव

उरुळी कांचन

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, जिल्हा परिषदेचे सी ओ आयुष प्रसाद यांचे हस्ते ग्रामविकासासाठी, महिला सक्षमीकरणासाठी व गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात आघाडीवर असलेल्या पूर्व हवेली तालुक्यातील सोरतापवाडी गावाला पुणे जिल्हा परिषदे अंतर्गत आर आर पाटील स्मार्ट व्हिलेज (सुंदर गाव) पुरस्कार २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी सन्मानचिन्ह व दहा लक्ष रुपये असा पुरस्कार सोरतापवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच संध्याताई अमित चौधरी व ग्रामविकास अधिकारी नंदकुमार चव्हाण व संतोष गायकवाड तसेच संतोष नेवसे यांना प्रदान करण्यात आला.

सोरतापवाडी ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य, घनकचरा, सांडपाणी निर्मूलन, वृक्षारोपण, संवर्धन, करवसुली, सुविधा, कृषी या सर्व आघाड्यावर काम करुन पर्यावरण, सौदर्य, आरोग्य संतुलित गावाच्यादृष्टीने ठळक कामे केल्याने जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन घाडगे, गटविकास अधिकारी अमर माने यांच्या मुल्यांकनात ग्रामपंयातीला स्मार्ट व्हिलेट म्हणून हवेली तालुक्यातून निवडण्यात आले आहे.

Previous articleपद्मश्री मणीभाई देसाई महाविद्यालयात डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती उत्साहात साजरी
Next articleअखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने श्री क्षेत्र भुलेश्वर येथे पोलीस बांधव, पत्रकार बांधवांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव