रस्ता दुरुस्ती करा अन्यथा खळखट्याक ; खेड तालुका मनसेच्या वतीने आंदोलनाचा इशारा

राजगुरूनगर-नगरपरिषद हद्दीतील वाळुंजस्थळ ते समृध्दीनगर रस्त्याची दुरवस्था झाली आहे.या रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्यात यावी,अन्यथा खेड तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यकर्ते खळखट्याक आंदोलन करतील,’असा इशारा देण्यात आला आहे.

यासंदर्भात नगरपरिषद व संबंधित विभागाला निवेदन देण्यात आले आहे.रस्त्याचे दुरुस्तीची मागणी यापूर्वी नागरिक व कार्यकर्त्यांनी केली आहे.

मात्र त्याकडे नगरपरिषद व संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.या रस्त्यावर खड्डे आहेत.हा प्रवासच अत्यंत त्रासदायक असून,या रस्त्यावर छोट्या- मोठ्या दुर्घटनाही घडल्या आहेत महागड्या गाड्यांचे नुकसान सुरूच आहे तसेच रस्ता खड्ड्यांमध्ये शोधावा लागतो त्यामुळे प्रथम या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्याची गरज आहे.नागरिकांना या रस्त्यावरुन जाता-येताना त्रास होतो.

शालेय विद्यार्थी आबालवृद्ध प्रशासकीय अधिकारी व कामगारांना कामावर ये-जा करावी लागते.या रस्त्याचा प्रवास खडतर,त्रासदायक असून, अनेकवेळा संबंधितांकडे तक्रार करुनही या रस्त्याची दुरुस्ती झाली नाही.तरी लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी,अशा आशयाचे निवेदन नगरपरिषद व संबंधित विभागाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते व जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांनी दिले आहे.

Previous articleखडकवासला मतदार संघातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी यासाठी शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा
Next articleभाजप च्या पुणे जिल्हा महिला अध्यक्ष पदी कांचन कुल यांची निवड