वीज उद्योगातील कंत्राटदार हटवून कामगारांना वयाच्या ६० वर्षा पर्यंत कंत्राटदार विरहित व शाश्वत रोजगार मिळावा : महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांची मागणी

कुरकुंभ : सुरेश बागल

वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांचे महत्वपूर्ण प्रश्न अजूनही प्रलंबित आहे या करिता संघटनेने वारंवार पाठपुरावा केला आहे. तसेच कंत्राटदार कामगाराच्या कडून कामाला लावताना, विविध कारणे दाखवून कामगारांचा पगारातून बेकायदेशीर पणे पैशाची मागणी केली जाते. याला विरोध करणारे कामगारांना बदली, कामावरून कमी करण्यात येते. या करिता शासनाने D B T पध्दतीने कामगारांना वेतन दिले पाहिजे व ६० वर्षापूर्वी पर्यंत रोजगार रक्षणासाठी योजना करावी अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष नीलेश खरात यांनी नागपूर येथे झालेल्या मेळाव्यात देण्यात आली.

महाराष्ट्र शासनाच्या शासनाच्या DBT माध्यमातून थेट बँक खात्यात मिळावे, या मागण्यासाठी साठी माजी ऊर्जामंत्री मा.चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रयत्न केले होते. मात्र सरकार बदलामूळे ३ वर्षे वीज कामगार या न्याया पासून वंचित राहीले या मागण्या पुन्हा नवीन सरकारकडे मांडन्यासाठी व राज्यातील कामगारांच्या प्रबोधनासाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी संघाने प्रत्येक जिल्ह्यात मेळावे घेण्याचा ठरवले याचा श्रीगणेशा नागपूर पासून सुरु झाला.

नागपूर झोन मधील वीज कंत्राटी कामगारांचा मेळावा भाग्यलक्ष्मी हॉल मानकापूर रोड नागपूर येथे मंगळवार दि. २ ऑगस्ट रोजी संपन्न झाला

भारतीय मजदूर संघाशी संलग्न वीज कामगार महासंघाने या कामगारांचे पालकत्व घेतले असून कायम कामगारांच्या खांद्याला खांदा देत काम करून कंपनीच्या प्रगतीमध्ये योगदान दिलेल्या कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरून लढा देऊ , तसेच कंत्राटी कामगारांच्या वेतन मध्ये २०% वेतन वाढ मिळवण्यासाठी कामगार महासंघाने च प्रयत्न केले त्यामुळे कामगारांना न्याय मिळाला. अशी ग्वाही अध्यक्ष विठ्ठल भालेराव, व माजी महामंत्री शंकर पहाडे यांनी मेळाव्यात दिली.

भारतीय मजदूर संघ नागपूरचे महामंत्री हर्पल ठोंबरे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न (भारतीय मजदूर संघ)
कंत्राटी कामगार संघाचे केंद्रीय अध्यक्ष निलेश खरात, महामंत्री सचिन मेंगाळे, नागुपर जिल्हाध्यक्ष राकेश मथुरे व सचिव अभिजित माहुलकर तर गोंदिया भंडारा जिल्हाध्यक्ष छोटु बोरकर व तेजु मुंगूलमारे व सुमारे २००कामगार मेळाव्यास उपस्थित होते.

Previous articleपुर्व हवेलीत चंदन चोरांचा सुळसुळाट ; मांजरी खुर्द-कोलवडी हद्दीत चंदनाच्या झाडांवर पडली चोरट्यांची ‘कु-हाड
Next articleकुरकुंभ एमआयडीसी रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी सचिन ठोंबरे आणि सचिव पदी शशिकांत पाटील यांची निवड