कुरकुंभ एमआयडीसी रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी सचिन ठोंबरे आणि सचिव पदी शशिकांत पाटील यांची निवड

कुरकुंभ : सुरेश बागल

कुरकुंभ (ता. दौंड ) रोटरी क्लब ऑफ कुरकुंभ एमआयडीसी च्या अध्यक्षपदी सचिन ठोंबरे आणि सचिव पदी शशिकांत पाटील यांची निवड करण्यात आली.

मंगळवार दि. २६ जुलै रोजी कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील एम.आय.डी.सी. कार्यालय येथे रोटरी क्लब ऑफ कुरकुंभ एम.आय.डी.सी .यांची बैठक घेण्यात आली.

यावेळी रोटरी चे प्रांतपाल मंजू फडके सहाय्यक प्रांतपाल गणेश काळभोर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

यावेळी अध्यक्ष म्हणून सचिन ठोंबरे व सचिव पदी शशिकांत पाटील आणि इतर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यावेळी माजी अध्यक्ष मनीष अग्रवाल यांनी गतवर्षीच्या काळातील सामाजिक कामाचा लेखाजोखा मांडून नवीन अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना भविष्यातील कारकिर्दी शुभेच्छा देण्यात आल्या.

रोटरी क्लबच्या माध्यमातून अनेक कामे केली असून चालू वर्षी नवनवीन कार्यक्रम राबवणार असून यामध्ये रक्तदान शिबिर व गरजू विद्यार्थ्यांना शाल उपयोगी वस्तूंचे वाटप करणे. असे अनेक सामाजिक कार्यक्रम घेतले जाणार आहेत असे नवीन अध्यक्ष सचिन ठोंबरे यांनी यावेळी सांगितले. यावेळी दौंड रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. राजेश दाते यांच्यासह रोटरी क्लब ऑफ कुरकुंभ चे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ पाटसचे विश्वास अवचट, इंदापूर रोटरी क्लबचे अध्यक्ष गांधी साहेब, सिंहगड रोटरी क्लब चे अध्यक्ष अमोल कागवडे, अकलूज रोटरी क्लबच्या अध्यक्षा स्वाती चंकेश्वर उपस्थित होत्या.

Previous articleवीज उद्योगातील कंत्राटदार हटवून कामगारांना वयाच्या ६० वर्षा पर्यंत कंत्राटदार विरहित व शाश्वत रोजगार मिळावा : महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांची मागणी
Next articleमराठी पत्रकार परिषद तालुका संपर्क अभियान राबविणार