पुर्व हवेलीत चंदन चोरांचा सुळसुळाट ; मांजरी खुर्द-कोलवडी हद्दीत चंदनाच्या झाडांवर पडली चोरट्यांची ‘कु-हाड

गणेश सातव,वाघोली

पुर्व हवेलीतील मांजरी खुर्द,कोलवडी भागात शेताच्या बांधांवर असणाऱ्या चंदनाच्या झाडांवर चंदन चोरट्यांनी डल्ला मारला आहे.अलीकडे परिसरात चंदन चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

काल मांजरी खुर्द येथील शेतकरी अशोक आव्हाळे यांच्या कोलवडी हद्दीत असणाऱ्या शेतातील चंदनाच्या झाडाची कत्तल अज्ञात चोरट्यांनी केली आहे.चोरट्यांनी संपूर्ण झाडचं कापल्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

परिसरात वारंवार अश्या चोरीच्या घटना घडत आहेत.वन व पोलीस विभागाने अश्या चोरीच्या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन पुढे अश्या घटना घडणार नाहीत याबाबत परिसरात गस्त वाढवली पाहिजे,अशी मागणी अशोक आव्हाळे व परिसरातील शेतकरी वर्गाने केली आहे.

Previous articleडॉ.मणिभाई देसाई पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी स्तुत्य उपक्रम संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रविण गायकवाड यांचे प्रतिपादन
Next articleवीज उद्योगातील कंत्राटदार हटवून कामगारांना वयाच्या ६० वर्षा पर्यंत कंत्राटदार विरहित व शाश्वत रोजगार मिळावा : महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांची मागणी