आंबेगाव तालुक्यात जागतिक आदिवासी दिन होणार धुमधडाक्यात साजरा

घोडेगाव  – 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो असा हा आदिवासी अस्मितेचा दिवस घोडेगाव येथे येत्या 9 ऑगस्ट रोजी सर्व आदिवासी संघटना व आदिवासी समाजबांधव यांच्या सहभागाने धुमधडाक्यात साजरा केला जाईल अशी माहिती डॉ हरीश खामकर यांनी दिली.
घोडेगाव येथे जागतिक आदिवासी दिन सांस्कृतिक उत्सव समगावगतीची नियोजन बैठक आदिवासी समाज विकास मंडळ कार्यालयात उत्साहात पार पडली यावेळी आंबेगाव तालुक्यातील सर्व आदिवासी संघटनेचे पदाधिकारी,नोकरदार वर्ग व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी अध्यक्षस्थानी डॉ हरीश खामकर ,डॉ राहुल जोशी हे होते तर बिरसा क्रांती दल,बिरसा ब्रिगेड ,ट्रायबल फोरम, कट्टर आदिवासी ग्रुप,महादेव ग्रुप,आदिवासी नोकरदार वर्ग,आदिवासी समाज विकास मंडळ,बी टी पी आदिवासी ग्रूप, एस एफ आय संघटना,तसेच विध्यार्थी संघटनेचे पदाधिकारी व आदिवासी राजकीय ,सामाजिक क्षेत्रातील समाजबांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मच्छिंद्रझाझरे यांनी केले यावेळी भीमाशंकर खोरे व आहुपे खोरे येथुन डिंभे या गावी आदिवासी समाजबांधव एकत्र येतील व तेथुन रॅली चे स्वरूप होऊन धावती रॅली घोडेगाव येथे पोहोचेल असे राजेश गाडेकर व गणेश मावळे यांनी सांगितले तर घोडेगाव येथे पारंपरिक आदिवासी वेशभूषा, व आदिवासी गावातील सांस्कृतिक पथके यांची मिरवणूक पार पडेल यावेळी अनेक गावातील पथके सहभागी होतील असे प्रदीप पारधी व बाळू कोकणे यांनी सांगितले.तर विशेष प्राविण्य मिळवलेल्या आदिवासी समाजबांधव ,आदिवासी भागात काम करणारे पत्रकार बांधव यांचा गुणगौरव व सन्मान सोहळा होणार असल्याचे सुरेश वालकोळी व किसन तळपे यांनी सांगितले . तर त्यानंतर सामाजिक प्रबोधनाचा व शेवटी स्नेहभोजनाचा कार्यक्रम होईल असे अविनाश गवारी यांनी सांगितले .

कोरोना महामारी मुळे गेली 2 वर्षे आदिवासी दिन साजरा होऊ शकला नाही परंतु ह्यावर्षी आदिवासी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने जागतिक आदिवासी दिनी सहभागी व्हावे असे आवाहन विजय आढारी यांनी केले.उपस्थितांचे आभार काळूराम भवारी व मोहन नंदकर यांनी मांडले.

Previous articleमहाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघाची पुणे जिल्हा कार्यकारणी जाहीर
Next articleअबेरडेअर टेक्नोलोजीस प्रायव्हेट लिमिटेड कडून कनेरसर येथील शाळांना शालेय दप्तरांचे वाटप